कारमधून येत परिसरात पायी फिरून महिला-मुलींना छेडणार्‍या विकृत तरुणास महिलांनी दिला ‘सॅण्डल’चा चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 06:43 PM2017-10-25T18:43:59+5:302017-10-25T18:53:05+5:30

सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक विकृत प्रवृत्तीचा इसम रात्री-मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार (एम.एच१६ एबी ०४१३) मधून येऊन खाली उतरत परिसरातील महिला-मुलींची छेड काढून अश्लील चाळे करत असल्याचे महिलांच्या लक्षात आले.

 Woman and girls wandered through the car coming from the premises | कारमधून येत परिसरात पायी फिरून महिला-मुलींना छेडणार्‍या विकृत तरुणास महिलांनी दिला ‘सॅण्डल’चा चोप

कारमधून येत परिसरात पायी फिरून महिला-मुलींना छेडणार्‍या विकृत तरुणास महिलांनी दिला ‘सॅण्डल’चा चोप

Next
ठळक मुद्दे‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार पायतल्या जोड्यांनी चोपून काढले तीवारी हा इंदिरानगर परिसरातील सुशील अपार्टमेंटमधील रहिवासी

नाशिक : इंदिरानगर परिसरात यापुर्वी दुचाकीवरून येत एका तरुणाने महिला-मुलींची छेडछाड करत विकृत चाळे करण्याचा ‘उद्योग’ सुरू केला होता. यानंतर काही दिवसांपासून येथील राजसारथी सोसायटी, आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक इसम चारचाकीमधून येऊन महिला-मुलींची छेड काढत विकृत चाळे करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर महिलांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक विकृत प्रवृत्तीचा इसम रात्री-मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार (एम.एच१६ एबी ०४१३) मधून येऊन खाली उतरत परिसरातील महिला-मुलींची छेड काढून अश्लील चाळे करत असल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यानंतर सदर बाब दक्ष नागरिकांनी पोलीसांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र पोलिसांना तो मिळून आला नाही. अखेर महिलांनी त्याच्यावर पाळत ठेवून ‘अ‍ॅक्शन प्लान’ रचला. दरम्यान, विकृत इसम राजेंद्रकुमार तीवारी (३२) हा परिसरात नेहमीप्रमाणे आला आणि वाहनातून उतरून चाळे करु लागला. अश्लील नजरेने महिला-मुलींकडे बघून हावभाव करत असल्याचे लक्षात आल्यानंतर एका महिलेने त्याला हटकले. यावेळी तीवारी याने तिचा हात धरून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला; मात्र सदर बाब परिसरातील अन्य महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला धरून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार पायतल्या जोड्यांनी चोपून काढले. तीवारी हा इंदिरानगर परिसरातील सुशील अपार्टमेंटमधील रहिवासी असून महिलांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी त्याची कार जप्त केली असून अधिक तपास इंदिरानगर पोलीस ठाणे करीत आहेत

Web Title:  Woman and girls wandered through the car coming from the premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.