महिनाभरात नाशिक जिल्ह्यातील धरणातील दहा टक्के जलसाठा घटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 06:42 PM2018-03-16T18:42:12+5:302018-03-16T18:42:12+5:30

Within a month, ten percent of the storage in the dam in Nashik district decreased! |  महिनाभरात नाशिक जिल्ह्यातील धरणातील दहा टक्के जलसाठा घटला !

 महिनाभरात नाशिक जिल्ह्यातील धरणातील दहा टक्के जलसाठा घटला !

Next
ठळक मुद्दे ४६ टक्केच पाणी : ऊन वाढताच कमालीची घट गेल्या चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर

नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू झाली असून, आॅक्टोबरअखेर सरासरी ९८ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये गेल्या चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर करण्यात आल्याने सध्या ४६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाचे प्रमाण यापेक्षाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने ते पाहता पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
गेल्यावर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पाऊस लांबणीवरही परिणाम होत असल्याचे हवामान खात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये सरासरी ९८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यात पाणी सोडावे लागले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांतील पाण्यावर आरक्षण टाकण्यात येऊन त्यानुसार आवर्तने सोडली जात असून, आजअखेर ४८००४ दशलक्ष घनफूट म्हणजेच ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ६५ टक्के इतके पाणी असून, एकट्या गंगापूर धरणात ६९ टक्के पाणी आहे. कश्यपी धरणात ९३, तर आळंदीत ६१ टक्के पाणी शिल्लक आहे. पालखेड धरण समूहातून परजिल्ह्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने ३८ टक्केच पाणी शिल्लक आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत निम्म्याने पाणीसाठा घटला आहे. त्यात पालखेड धरणात फक्त नऊ टक्के पाणी आहे. दारणा धरणात ७१ टक्के पाणी शिल्लक असून, ओझरखेडला ६४ टक्के पाणी आहे. गिरणा खोºयातील चणकापूरमध्ये ६० टक्के, तर हरणबारीत ३४ टक्के व गिरणात २८ टक्केच पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे, यंदा पावसाळ्यात गिरणा धरण दहा वर्षांनंतर पूर्णपणे भरले होते. या धरणातील ८० टक्के पाण्याचा वापर गेल्या चार महिन्यांत करण्यात आला आहे.
मार्च व एप्रिल महिन्यात सिंचनासाठी असलेले आरक्षण विविध धरणांतून सोडण्यात येणार असून, यापुढच्या काळात पाण्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकूण ४६ टक्के पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

Web Title: Within a month, ten percent of the storage in the dam in Nashik district decreased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.