विंचूरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:01 AM2019-06-15T01:01:08+5:302019-06-15T01:02:16+5:30

विंचूरसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन विंचूर येथे स्मशानभूमी पाटाजवळ अज्ञात इसमाने फोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला.

Wipro water supply pipeline | विंचूरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फोडली

विंचूरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फोडली

googlenewsNext

लासलगाव : विंचूरसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन विंचूर येथे स्मशानभूमी पाटाजवळ अज्ञात इसमाने फोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला.
गेली काही दिवस खंडित वीजपुरवठा आणि जीर्ण झालेल्या पाइपलाइन फुटत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यातच शुक्रवारी (दि.१४) लासलगाव, विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा पाइपलाइन विंचूर येथील स्मशानभूमी पाटाजवळ अज्ञात इसमाने फोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला. दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तातडीने सदर दुरुस्तीचे काम हाती घेतले. ग्रामपंचायतीने अज्ञात व्यक्तीविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात यावा, अशा आशयाचे पत्र दिले आहे. यापूर्वीही विंचूर बसस्थानक भागात या पाणी योजनेचे व्हॉल्व्ह फोडण्यात आले होते.

Web Title: Wipro water supply pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.