वाइन टुरिझमची मौज : देशी-विदेशी पर्यटकांचा सहभाग ‘सुला’मध्ये थिरकली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:47 AM2018-02-04T00:47:38+5:302018-02-04T00:48:40+5:30

नाशिक : एकाहुन एक सरस बँडने केलेल्या भारतीय संगीतासोबतच पाश्चिमात्य संगीताच्या ठेक्यावर तरुणाई सुला फेस्टच्या पहिल्याच दिवशी थिरकली.

Wine Tourism Fun: Country and foreign tourists participate in 'Suala' | वाइन टुरिझमची मौज : देशी-विदेशी पर्यटकांचा सहभाग ‘सुला’मध्ये थिरकली तरुणाई

वाइन टुरिझमची मौज : देशी-विदेशी पर्यटकांचा सहभाग ‘सुला’मध्ये थिरकली तरुणाई

Next
ठळक मुद्देवाइन पर्यटनाचे केंद्रदेशी-विदेशी संगीताच्या तालावर ठेका

नाशिक : एकाहुन एक सरस बँडने केलेल्या भारतीय संगीतासोबतच पाश्चिमात्य संगीताच्या ठेक्यावर तरुणाई सुला फेस्टच्या पहिल्याच दिवशी थिरकली. नाशिकमधील वाइन पर्यटनाचे केंद्र असलेल्या सुला वाइन्समध्ये पहिल्या दिवशी क्रि स्टल फायटर बँड आकर्षणाचा केंद्र ठरला. सुला विनियड्सच्या निसर्गरम्य प्रांगणात शनिवारी (दि.३) ‘सुला फेस्ट २०१८’ ला सरुवात झाली. पहिल्याच दिवशी अ‍ॅम्फी थिएटर, आत्मोसफियर आशा दोन ठिकाणी देशी-विदेशी संगीताच्या तालावर पर्यटकांनी ठेका धरत वाइन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. पहिल्या दिवशी किवीस्टार, रन पुसी रन, ग्रेन, जिप्सी हिल यांनी सादरीकरण केले. सायंकाळच्या वेळी क्रिस्टल फायटर्सने संगीताने प्रत्येकालाच ठेका धरण्यास भाग पाडले. आत्माफियर येथे लेओन, ८ बिट कलटप्रीट, बेरनी, स्टेफनो रिचेटा यांचे सादरीकरण झाले.
सुला फेस्टला पहिल्या दिवशी उपस्थित राहू न शकणाºया पर्यटकांसाठी रविवारी संगीतकार अमित त्रिवेदीच्या संगीताचा नजराणा अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Web Title: Wine Tourism Fun: Country and foreign tourists participate in 'Suala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक