विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळणे गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:44 PM2018-12-18T17:44:39+5:302018-12-18T17:44:51+5:30

मालेगाव : आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांकरिता शासनाने निश्चित धोरण आखले पाहिजे. या विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळाल्यास त्या हिमतीने समस्यांचा सामना करीत स्वताच्या कुटुंबाचा उद्धार करतील, असे प्रतिपादन दिप्ती राऊत यांनी केले.

Widows should get support from the government and the community | विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळणे गरजेचे 

विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळणे गरजेचे 

googlenewsNext

मालेगाव : आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांकरिता शासनाने निश्चित धोरण आखले पाहिजे. या विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळाल्यास त्या हिमतीने समस्यांचा सामना करीत स्वताच्या कुटुंबाचा उद्धार करतील, असे प्रतिपादन दिप्ती राऊत यांनी केले.
येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. ‘कोरडी शेतं, ओले डोळे; व्यथा शेतकरी विधवांच्या’ या आपल्या व्याख्यानात त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांना प्रत्यक्ष भेटून पाहिलेली विदारक वस्तुस्थिती श्रोत्यांसमोर मांडली.
शेतकरी आत्महत्यांबद्दल मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत त्यामुळे समाजाची आणि सरकारची या प्रश्नांकडे पाहण्याची भूमिका पूर्वग्रहदूषित असल्याचे नमूद करून ती वास्तववादी व संवेदनशील असल्यास निश्चितच परिस्थितीत सकारात्मक बदल घडू शकतो, असे त्यांनी सांगितले.
बहुसंख्य शेतकरी महिलांना नवऱ्याच्या आर्थिक व्यवहारांची अजिबात माहिती नसते. किती कर्ज आहे, कुणाकडून घेतले आहे, काय तारण ठेवले आहे, सातबारावर कुणाचे नांव आहे या बाबतीत त्या अनिभज्ञ असतात. कुटुंबांमध्ये परस्पर संवाद असला आणि महिलांना आर्थिक व्यवहाराची जाण असली तर अनेक शेतकरी आत्महत्या टळू शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह होते. शाह यांनी समाजातील संवेदनशीलता कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून शेतकरी विधवांच्या समस्यांवर व्याख्यान आयोजित करण्यामागची भूमिका विशद केले.

Web Title: Widows should get support from the government and the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी