मानवी हाडांचा सापळा आढळतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:25 AM2019-06-25T01:25:18+5:302019-06-25T01:25:41+5:30

पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या संरक्षक भिंतीला लागून सोमवारी (दि.२४) सकाळच्या सुमाराला मानवी हाडांचा एक सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली.

 When human bones are detected ... | मानवी हाडांचा सापळा आढळतो तेव्हा...

मानवी हाडांचा सापळा आढळतो तेव्हा...

googlenewsNext

पंचवटी : पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या संरक्षक भिंतीला लागून सोमवारी (दि.२४) सकाळच्या सुमाराला मानवी हाडांचा एक सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली. कवटी तसेच दोन्ही पायांचे हाडे आढळून आल्याने सदरचा मृतदेह इसमाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पेठरोड परिसरात मानवी हाडांचा सापळा आढळून आल्याची माहिती कळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलीस बेपत्ता इसमाचा शोध घेत असून, मृतदेहाची ओळख पटावी यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी सकाळी सापळा आढळून आल्यानंतर घटनास्थळी वैद्यकीय पथक तसेच न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथक दाखल झाले होते. त्यांनीदेखील तपासणीसाठी काही नमुने घटनास्थळावरून ताब्यात घेतल्याचे समजते.
आरटीओ कार्यालयामागील जागेत मोकाट श्वानांनी जमीन उकरून मानवी मृतदेह बाहेर काढून कुरतडल्याने सापळ्याची ओळख सदर मृतदेह मोकाट श्वानांनी कुरतडल्याने ओळख पटविणे अवघड आहे. कवटीवर पांढरे केस आणि पायाचे दोन्ही हाडे असलेला सापळा आढळल्याने तो एखादा वृद्ध इसमाचा असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सदर इसमाचा घटनास्थळी मृत्यू झाला की त्याला कोणी त्याठिकाणी आणून टाकले याबाबत पंचवटी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  When human bones are detected ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.