हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:38 PM2018-05-24T13:38:43+5:302018-05-24T13:38:43+5:30

येवला : विश्व हिंदू परिषद (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) दुर्गा वाहिनीचा शौर्य प्रशिक्षण वर्ग बाभूळगाव ता.येवला येथे सुरु आहे. बुधवारी सायंकाळी शहरात दुर्गा वाहिनीच्या २१५ युवतींचा समावेश असलेली भव्य शोभा यात्रा निघाली. शिस्तबद्ध शोभायात्रेस शनिपटांगणापासून प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून सुमारे दोन तास शोभा यात्रा चालली.मिरवणूक मार्गात हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है अशा गगनभेदी घोषणा दिल्या.

 We are the women of India, not the full spark | हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है

हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है

Next

येवला : विश्व हिंदू परिषद (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) दुर्गा वाहिनीचा शौर्य प्रशिक्षण वर्ग बाभूळगाव ता.येवला येथे सुरु आहे. बुधवारी सायंकाळी शहरात दुर्गा वाहिनीच्या २१५ युवतींचा समावेश असलेली भव्य शोभा यात्रा निघाली. शिस्तबद्ध शोभायात्रेस शनिपटांगणापासून प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून सुमारे दोन तास शोभा यात्रा चालली.मिरवणूक मार्गात हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है अशा गगनभेदी घोषणा दिल्या. थिएटर रोड-सावरकर चौक-मेन रोड-टिळक मैदान-राणाप्रताप चौक-काळामारूती रोड-गंगादरवाजा-बालेश्वरी मंदिर-शिनपटांगण या प्रमुख मार्गाने सघोष शोभायात्रा निघाली.रस्त्यात चौकाचौकात माता भगिनी व नागरिकांनी या शोभा यात्रेचे फुलांचा वर्षाव ठिकठिकाणी दुर्गावाहिनी स्वयंसेविकांचे स्वागत करण्यात आले.ठिकठिकाणी रस्त्यावर विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. टिळक मैदानात आनंद शिंदे, दिनेश शिंदे मित्र परिवाराने जंगी स्वागत केले. तनय्या कंदलकर ही झाशीच्या राणीच्या वेशात, नंदिनी गुजराथी भारत मातेच्या वेशात, याशिवाय आधुनिक रायफल आणि पिस्तूल धारी युवती ह्या प्रमुख आकर्षण ठरल्या. या प्रशिक्षण शिबिरात २७५ युवती सहभागी झाल्या असून या वर्गात दंडयुद्ध, जुडो कराटे, रायफल नेमबाजी, योगासने शिकविण्यात आले. मिरवणूक मार्गात, शस्र,दंड, नियुद्ध, संरक्षण पारंगत खेळ यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.अ‍ॅड मृणालिनी पडवळ, माधवी देशपांडे, नेहा पटेल,यांनी या प्रशिक्षण केंद्राचे नियंत्रण व मिरवणूक संचलन केले. नाशिक विभाग मंत्री अ‍ॅड शैलेश भावसार,जिल्हा अध्यक्ष अनिरु द्ध पटेल, कृष्णा वडे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हे नियोजन सांभाळत आहे. स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या.येथील गुजराथी समाजाच्या मुरलीधर मंदिरात नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title:  We are the women of India, not the full spark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक