शहरात पाणीकपातीचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:00 AM2019-05-18T01:00:13+5:302019-05-18T01:00:32+5:30

हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर असल्याचे जाहीर केल्याने सध्या धरणात पुरेसे पाणी असले तरी, पाऊस जर लांबला तर पाणी कोठून आणणार याचे उत्तर सापडत नसल्याने येत्या काही दिवसांत नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे संकेत पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दिले

 Water signs in the city! | शहरात पाणीकपातीचे संकेत !

शहरात पाणीकपातीचे संकेत !

Next

नाशिक : हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर असल्याचे जाहीर केल्याने सध्या धरणात पुरेसे पाणी असले तरी, पाऊस जर लांबला तर पाणी कोठून आणणार याचे उत्तर सापडत नसल्याने येत्या काही दिवसांत नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे संकेत पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दिले असून, या संदर्भात महापालिका, जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन त्यात अंतिम निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कुंटे हे नाशिक जिल्हा दौºयावर आले असता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी दुष्काळी परिस्थितीच्या गांभीर्यावर भाष्य केले. नाशिक शहराची वाढती लोकसंख्या व त्यासाठी लागणारे पाण्याचा विचार करता, गंगापूर धरणातून शहरासाठी ४९०० दशलक्ष घनफूट इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. आॅक्टोबर ते मे महिन्यापर्यंत महापालिकेने ३४४० दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याचा वापर केला आहे. शहरासाठी महापालिका दररोज १६.१८ दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा धरणातून करीत आहे.
उन्हाळ्यात पाणी उचलण्याचे हे प्रमाण पाहता, महापालिकेने जुलैअखेरपर्यंत केलेल्या नियोजनानुसार हे योग्य असले तरी, उन्हाच्या तडाख्याने धरणातील पाण्याचे वाढते बाष्पीभवनाचे प्रमाण व त्यातच यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडणार असल्याचे हवामान खात्याने दिलेले संकेत पाहता, जून, जुलै महिन्यांत पाऊस पडला नाही तर ऐनवेळी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धावपळ करण्याची वेळ येवू शकते.
कठोर भूमिका घ्यावी लागणार
महापालिकेसाठी आरक्षित असलेले पाणी व जुलैअखेरपर्यंत लागणारे पाण्याचा विचार करता, शहरात पाणीकपात करण्याबाबत महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून धोरण ठरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे शहरातही पाणी जपून वापरावे लागणार असून, शहरातील काही भागांत पाण्याचा होणाºया अपव्ययाबाबत महापालिकेला कठोर भूमिका घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.
सध्या गंगापूर धरणात २५ टक्के, तर धरण समूहात १६ टक्के पाणी शिल्लक असल्याची बाब पाटबंधारे खात्याने पालक सचिव सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून देतानाच महापालिकेला पाणीकपातीचा सल्ला देण्याची विनंती केली. त्याचा आधार घेत कुंटे यांनी पत्रकारांशी बोलताना भविष्यातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज बोलून दाखविली.

Web Title:  Water signs in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.