तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाण्याची उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:36 AM2018-05-08T00:36:17+5:302018-05-08T00:36:17+5:30

उन्हामुळे दिवसेंदिवस उष्णतेच्या झळा वाढत चालल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मनुष्य पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कुठूनही सोय करू शकतो; परंतु तहान भागवण्यासाठी पशू-पक्ष्यांना सहजतेने पाणी उपलब्ध होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात पशू-पक्ष्यांसाठी सामूहिक पाणपोईचा उपक्र म हाती घेतला आहे.

 Water availability for thirsty birds | तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाण्याची उपलब्धता

तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाण्याची उपलब्धता

googlenewsNext

पंचवटी : उन्हामुळे दिवसेंदिवस उष्णतेच्या झळा वाढत चालल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मनुष्य पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कुठूनही सोय करू शकतो; परंतु तहान भागवण्यासाठी पशू-पक्ष्यांना सहजतेने पाणी उपलब्ध होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात पशू-पक्ष्यांसाठी सामूहिक पाणपोईचा उपक्र म हाती घेतला आहे.  उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात पक्ष्यांना दूरवर भटकंती करावी लागते, तर काही वेळेस पाण्याअभावी त्यांचा मृत्यू होतो. उन्हाळा जाणवू लागल्याने पाण्याचे साठे आटू लागले आहेत. शहरातही पाणीटंचाई सुरू झाली आहे. उष्म्यामुळे तहान वाढली आहे. मनुष्य पाणी पिण्याची सोय करू शकतो; परंतु भटके श्वान, मांजर, खारु ताई, चिमणी, कावळा, साळुंकी, कबूतर यांसारख्या विविध पशू-पक्ष्यांना तहान भागवण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय नसतेच.  शहरातील आवश्यक ठिकाण निवडून तेथे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. या उपक्र माला हिरावाडी रोडवरील त्रिमूर्तीनगर येथे उपाध्यक्ष दीपक पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली. पाणी ठेवण्यासाठी मोठा आकार
असलेली सीमेंटची भांडी शहरातील आवश्यक ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनीदेखील आपापल्या परीने बाल्कनी, बगीचा, घरासमोरील अंगणात पक्षी व शक्य झाल्यास  पशूंसाठी पाणी व अन्नाची सोय  करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  याप्रसंगी शहराध्यक्ष अंबादास खैरे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. चिन्मय गाढे, दीपक पाटील, नीलेश कर्डक, भूषण गायकवाड, कमलाकर गोडसे, सुशांत कुºहे, संतोष पुंड, प्रकाश भोर, रोहित जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  Water availability for thirsty birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी