आरटीई प्रवेशार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांना दुसऱ्या सोडतीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 06:58 PM2019-05-24T18:58:28+5:302019-05-24T19:03:24+5:30

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसºया फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसऱ्या सोडतीची प्रतीक्षा कायम आहे.

Waiting for second leak for parents of students of RTE Entrants | आरटीई प्रवेशार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांना दुसऱ्या सोडतीची प्रतिक्षा

आरटीई प्रवेशार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांना दुसऱ्या सोडतीची प्रतिक्षा

Next
ठळक मुद्देआरटीईच्या दुसऱ्या सोजतीची प्रतिक्षा कायमपहिल्या फेरीनंतर 15 दिवस उलटूनही सूचना नसल्याने साशंकता नाशिक जिल्ह्यातील 12 हजारहून अधिक विथ्यार्थी सोडतीच्या प्रतिक्षेत

  नाशिक : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसºया फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसऱ्या सोडतीची प्रतीक्षा कायम आहे.
आरटीईची प्रक्रिया यंदा आधीच दोन महिने उशिराने सुरू झाली असून, त्यात पहिल्या फेरीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपून आता दोन आठवड्यांचा कालावधी झाला असतानाही दुसरी यादी जाहीर होत नसल्याने आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील हे प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी पहिली सोडत जाहीर केली होती. त्यात जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सुरुवातील २६ एप्रिलनंतर ४ मे आणि १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतीअंति पहिल्या यादीतील दोन हजार ४८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. आरटीई अंतर्गत यंदा जिल्ह्यातील ४५७ शाळांत ५ हजार ७६४ जागा उपलब्ध आहेत. त्यातील जवळपास अडीच हजार जागा निश्चित झाल्याने अद्याप दोन हजार जागांवरील प्रवेश शिल्लक आहे. नर्सरी आणि पहिलीच्या वर्गासाठी जिल्हाभरातून १४ हजार ५५३ अर्ज आले असल्याने अद्याप १२ हजार विद्यार्थ्यांचे पालक दुसºया यादीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, आरटीईच्या संकेतस्थळावर  पहिल्या यादीला मिळालेल्या मुदतवाढीची माहिती अजूनही झळकत असून, दुसऱ्या सोडतीविषयी कोणतीही सूचना नसल्याने पालकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. तसेच संकेतस्थळावर दुसरी यादी कधी जाहीर होणार आहे, त्या विलंब का होत आहे, याबाबत माहिती मिळावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.  

Web Title: Waiting for second leak for parents of students of RTE Entrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.