कचरा टाकणायांवर कारवाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:51 AM2018-02-24T00:51:58+5:302018-02-24T00:51:58+5:30

परिसरातील मुख्य रस्त्यांवर खरकटे अन्न तसेच कचरा टाकून परिसराला बकाल स्वरूप निर्माण करणाºया बेशिस्त नागरिकांवर मनपाच्या पंचवटी आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 Waiting for action on garbage doves | कचरा टाकणायांवर कारवाईची प्रतीक्षा

कचरा टाकणायांवर कारवाईची प्रतीक्षा

Next

पंचवटी : परिसरातील मुख्य रस्त्यांवर खरकटे अन्न तसेच कचरा टाकून परिसराला बकाल स्वरूप निर्माण करणाºया बेशिस्त नागरिकांवर मनपाच्या पंचवटी आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महापालिका प्रशासनाने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी योजना सुरू केलेली असली तरी, परिसरातील काही नागरिक विशेषत: महिला रस्त्याच्या कडेला कचरा तसेच खरकटे अन्न फेकतात. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते. उंदीर, घुशींचा प्रादुर्भाव वाढतो. उघड्यावर कचरा फेकला जात असल्याने गायी, कुत्री या मोकाट प्राण्यांचा उपद्रव वाढत  आहे.  महापालिका प्रशासनाने ब्लॅक स्पॉट ठरविलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडून असतो. घंटागाडी कर्मचारी कचरा गोळा करतात; मात्र काही वेळातच बेशिस्त महिला कचरा गोळा केलेल्या जागेवर पुन्हा कचरा टाकून परिसर दुर्गंधीयुक्त करीत असल्याचे दिसून येते. पंचवटी परिसरातील गंगाघाट, दिंडोरीरोड, पेठरोड, हिरावाडी आदींसह जवळपास सर्वच परिसरात ही परिस्थिती  आहे.
उघड्यावर अन्न टाकण्याचा प्रकार
महापालिका आरोग्य विभागाने उघड्यावर कचरा तसेच खरकटे अन्न टाकून परिसराला बकाल स्वरूप प्राप्त करणाºया बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्यास परिसरात कायम स्वच्छता राहील. बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी उघड्यावर कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई गरजेची असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले आहे.

Web Title:  Waiting for action on garbage doves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.