आनंद आखाड्याचे पीठाधीश्वर बालकानंद गिरी यांची त्र्यंबकला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 04:35 PM2018-09-14T16:35:39+5:302018-09-14T16:36:02+5:30

त्र्यंबकेश्वर : तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचे आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी भेट दिली.

Visit to Trimbakkum of Baladan Giri, Pithadishwar of Anand Aakhada | आनंद आखाड्याचे पीठाधीश्वर बालकानंद गिरी यांची त्र्यंबकला भेट

आनंद आखाड्याचे पीठाधीश्वर बालकानंद गिरी यांची त्र्यंबकला भेट

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचे आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी भेट दिली. बालकानंद गिरी महाराजांनी प्रथम श्री स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या आश्रमाला भेट दिली. यावेळी सागरानंद सरस्वती, स्वामी शंकरानंद सरस्वती, गणेशानंद सरस्वती, श्री महंत धनराजगिरी आदींनी त्यांचा पुष्पहार, शाल श्रीफळ देउन सत्कार केला.
यावेळी ते म्हणाले, मी येथे भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन व श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाडा येथील साधूंच्या सदिच्छा
भेटीसाठी आलो आहे. त्यानंतर श्रीनिरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर महेशानंद गिरी यांच्यासह विविध साधुंची भेट चर्चा केल्यानंतर त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन ते मुंबईकडे रवाना झाले.
अलाहाबाद येथील कुंभाबाबत चर्चा
आनंद आश्रमात झालेल्या बैठकीत अलाहाबाद येथे २०१९ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबत विचार-विनिमय करण्यात आला. आखाड्याच्या साधूंची व्यवस्था, भाविकांसाठी सुविधा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: Visit to Trimbakkum of Baladan Giri, Pithadishwar of Anand Aakhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक