कर्मवीर एक्स्पोमधून विद्यार्थ्यांनी घडवले वैज्ञानिक दिव्यदृष्टीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 05:41 PM2018-03-23T17:41:22+5:302018-03-23T17:41:22+5:30

इंजिनीअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी पॉवर सेक्टर व जलव्यवस्थापनावर विशेष संशोधन विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यासाठी के. के. वाघ. अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘कर्मवीर एक्स्पो’मध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान संशोधनातून वैज्ञानिक क्षेत्रतील त्यांच्या दिव्यदृष्टीचे दर्शन घडवत विविध विषयांवरील संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. 

The vision of a scientist's vision made by students from Karmaveer Expo | कर्मवीर एक्स्पोमधून विद्यार्थ्यांनी घडवले वैज्ञानिक दिव्यदृष्टीचे दर्शन

कर्मवीर एक्स्पोमधून विद्यार्थ्यांनी घडवले वैज्ञानिक दिव्यदृष्टीचे दर्शन

Next
ठळक मुद्देकर्मवीर एक्सोला शुक्रवारपासून प्रारंभ देशभरातून सातशे नवसंशोधकांचा सहभाग विद्यार्थ्यांनी सादर केले विविध प्रकल्प

नाशिक : इंजिनीअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी पॉवर सेक्टर व जलव्यवस्थापनावर विशेष संशोधन विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यासाठी के. के. वाघ. अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘कर्मवीर एक्स्पो’मध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान संशोधनातून वैज्ञानिक क्षेत्रतील त्यांच्या दिव्यदृष्टीचे दर्शन घडवत विविध विषयांवरील संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी (दि. 3)‘कर्मवीर एक्पो’ चे उद्घाटन झाले, याप्रसंगी कोसे इंडियाचे संचालक गौरव गुप्ता व  क्रॉम्प्टनचे  के. ई. वायरस, अंतराळ अभ्यासक अपुर्वा जाखडी, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, प्राचार्य एन. के.नांदुरकर, डॉ. ओ. जी. कुलकर्णी,  डी. एम. मेथीकर, अविनाश शिरोडे, डॉ. बी.ई. कुशारे उपस्थित होते. या प्रदर्शनात देशभरातून महाराष्ट्र, कर्नाटक , केरळ, मध्यप्रदेश, गुजरात आदि राज्यांतून सुमारे 700 विद्यार्थ्यांनी सहभागी होत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक आविष्कार सादर केले आहेत. अंध, अपंग व्यक्तींना सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध उपकरणांसोहतच वेगेवेगळ्य़ा पर्यावरणपुरक मार्गाने वीज निर्मिती, जलशुद्धीकरण प्रकल्प, पर्यावरण पुरकवाहने, शेती क्षेत्रसाठी सहाय्यभूत ठरणारी उपकरणो,  गायीच्या गोठय़ाचे तपमान नियंत्रित करणारे उपकरण आदि तंत्रज्ञानाधारीत प्रकल्पांच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कल्पक अणि वैज्ञानिक दृष्टीकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्यांनी विशेषत: ऊर्जा व जल व्यवस्थापनावर विशेष संशोधन करून राष्ट्राची प्रगती करण्यास हातभार लावावा, असे आवाहन केले. कर्मवीर एक्स्पोसारख्या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे मत उद्घाटनप्रसंगी उपस्थित पाहूण्यांनी व्यक्त केले आहे. 

अंधांसाठी डिजिटल डोळ्य़ांचे तंत्रज्ञान
बंगळुरू येथील बीएनएमआयटी महाविद्यालयातील विद्याथ्र्यानी तयार केलेल्या ‘दृष्टी-व्हच्युल आय’ प्रकाल्पांने सर्वाचे लक्ष वेधून घेतेले. शमा एम.एस, हितेश व्ही व संदेश एस या विद्याथ्र्यानी डिजिटल कॅमेरे व संगणकीय यंत्रणोच्यासह्याने वस्तु व परिसराची ओळख संकलीत करून ती अंध व्यक्तीला सांगिली जाते. त्यामुळे अंध व्यक्तीला आपल्या समोर कोण आले ते ओळखणो शक्य होईल असा दावा विद्याथ्र्यानी या प्रकल्पाच्या माध्यमातून केला आहे. परंतु, संबधित व्यक्ती अथवा परिसराची माहिती प्रथम संघणात समाविष्ट करणो गरजेचे आहे. त्यानंतर संघणक आपल्या आर्टिर्फिशीयल इंटेलिजेन्सचा वापर करून अंध व्यक्तीला काही महत्वाच्या कामासाठी दृष्टी देण्याचे काम करेल असा दावा या विद्याथ्र्यानी केला आहे. 

Web Title: The vision of a scientist's vision made by students from Karmaveer Expo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.