विनोद तावडे : शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न

By admin | Published: May 22, 2015 10:41 PM2015-05-22T22:41:32+5:302015-05-22T22:48:38+5:30

पहिलीच नव्हे बालवाडीलाही २५ टक्के प्रवेश

Vinod Tawde: Tried for the implementation of the Right to Education Act | विनोद तावडे : शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न

विनोद तावडे : शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न

Next

नाशिक : शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात आले. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी बोलून या प्रश्नावर तोडगा काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता, परंतु संस्थाचालक न्यायालयात गेल्याने न्यायालयाने त्यांना पहिलीच नव्हे, तर बालवाडीलाही २५ टक्के प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता त्यांना त्याची अंमलबजावणी करावीच लागेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या तावडे यांना शिक्षण हक्क कायद्याविषयी विचारले असता त्यांनी आता न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संस्थाचालकांची असल्याचे म्हटले आहे. इयत्ता पहिलीत २५ टक्केप्रवेश द्यावेत, अशी शासनाची भूमिका होती. खासगी शिक्षण संस्थाचालकांनी यासंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्यावरून पहिलीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. पहिलीत थेट प्रवेश कसा देणार, असेही संस्थाचालकांचे म्हणणे होते. सदर विषय घेऊन संस्थाचालक न्यायालयात गेले होते.
आता न्यायालयानेच त्यांना पहिली आणि बालवाडी यात आता २५ / २५ टक्के प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शासनाच्या अखत्यारितील ही बाब राहिलेली नाही.

Web Title: Vinod Tawde: Tried for the implementation of the Right to Education Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.