भाजीविक्रेत्यांचा वाद विकोपाला ; दोन वर्षांपासून  जागेचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:04 AM2017-11-22T00:04:05+5:302017-11-22T00:29:46+5:30

येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील भाजीविक्रेते आणि बाहेरील विक्रेते यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, हा वाद मिटेपर्यंत मंडईतील विक्रेत्यांनी मंडई बाहेर रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असून, नागरिक त्रस्त झालेले आहेत. मनपा प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाहीतर दोन्ही विक्रे त्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

Vegetable dispute vikopala; Space for two years | भाजीविक्रेत्यांचा वाद विकोपाला ; दोन वर्षांपासून  जागेचा वाद

भाजीविक्रेत्यांचा वाद विकोपाला ; दोन वर्षांपासून  जागेचा वाद

googlenewsNext
ठळक मुद्देविक्रेत्यांनी मंडई बाहेर रस्त्यावर ठाण मांडले मोठा संघर्ष निर्माण होण्याची भीतीमनपा प्रशासन विक्रेत्यांमधील वाद सोडविण्यास अपयशी

सातपूर : येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील भाजीविक्रेते आणि बाहेरील विक्रेते यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, हा वाद मिटेपर्यंत मंडईतील विक्रेत्यांनी मंडई बाहेर रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असून, नागरिक त्रस्त झालेले आहेत. मनपा प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाहीतर दोन्ही विक्रे त्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.  सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईच्या आतील उर्वरित जागेवर मंडईबाहेरील विक्रेत्यांना बसविण्यात यावे आणि रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा, अशी मागणी मंडईतील भाजीविकेत्यांची आहे. या मागणीसाठी या विक्रेत्यांनी वेळोवेळी मनपाच्या विभागीय कार्यालयाजवळ आंदोलन छेडलेले आहे. जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी या मागणीकडे मनपा प्रशासनाने फारसे गांभीर्याने घेतलेले नाही, असा आरोप केला जात आहे.  मनपा प्रशासन विक्रेत्यांमधील वाद सोडविण्यास अपयशी ठरल्याने अखेर मंडईतील भाजीविक्रेत्यांनी मंगळवारपासून ठोस आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या विक्रेत्यांनी मंडईबाहेर रस्त्यावर भाजीविक्र ीचा व्यवसाय सुरू करून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय ग्राहक आणि रहिवाशांनी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने हा वाद लवकर निकाली काढावा, अशी मागणी केली जात आहे. 
नगरसेवकाचे आश्वासन 
प्रभागाचे नगरसेवक सीमा निगळ यांनी व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मनपा आयुक्त रजेवर असून, ते आल्यानंतर यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन  निगळ यांनी भाजीविक्रे त्यांना दिले.  शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक लोंढे यांनीही भाजीविक्रेत्यांची भेट घेऊन वाद मिटविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हा वाद तसाच असल्याने विक्रेत्यांनी  आंदोलन सुरू केले आहे.

Web Title: Vegetable dispute vikopala; Space for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.