त्वचेच्या संरक्षणासाठी  विविध बॉडीलोशन बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:15 AM2018-12-11T01:15:09+5:302018-12-11T01:15:48+5:30

शहरात थंडीचा कडाका जाणवत असून, शरीरावरील रुक्ष आणि उलणाऱ्या त्वचेची व आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारची बॉडीलोशन वापरण्याकडे सर्वांचाच कल वाढत आहे. बाजारात विविध प्रकारची बॉडीलोशन विक्रीस आहेत.

Various baudolation markets for skin protection | त्वचेच्या संरक्षणासाठी  विविध बॉडीलोशन बाजारात

त्वचेच्या संरक्षणासाठी  विविध बॉडीलोशन बाजारात

Next

नाशिक : शहरात थंडीचा कडाका जाणवत असून, शरीरावरील रुक्ष आणि उलणाऱ्या त्वचेची व आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारची बॉडीलोशन वापरण्याकडे सर्वांचाच कल वाढत आहे. बाजारात विविध प्रकारची बॉडीलोशन विक्रीस आहेत.
आला हिवाळा त्वचेचे आरोग्य सांभाळा असे म्हटले जाते. वाढत जाणाºया कडाक्याच्या थंडीचा फटका नाशिककरांना बसू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारात अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधने तसेच बॉडीलोशन स्कीन केअर क्रीम, फेसवॉश, फेसपॅक बाजारात दाखल झालेली आहेत. यासोबतच हिवाळ्यात रुक्ष होणाºया त्वचेसाठी नाशिककर विशेषत: स्त्रिया आयुर्वेदिक लेप पावडर तसेच घरगुती उपायांनाही जास्तीत जास्त प्राधान्य देतात. सौंदर्य प्रसाधनांमध्ये त्वचेची विशेष निगा राखणारे अनेक
नामांकित ब्रॅण्डची उत्पादने बाजारात दाखल झाले आहे. त्यावर  आकर्षक सूट व सवलतही देण्यात येत आहे. या ब्रॅण्डच्या गर्दीतही काही जुन्या ब्रॅण्डने आपले स्थान अबाधित ठेवले आहे. 
आहारात पौष्टिक पदार्थांचा वापर करावा, तिळाच्या तेलाचा वापर हातपायांना मसाज करण्यासाठी वापरावा, नामांकि त कंपन्यांचे उत्पादन वैद्यकीय सल्ल्यानुसार वापरावे, घरगुती उपायांमध्ये हळद, दही, बेसन, मधाचा वापर करावा.
- डॉ. नेहा गुुंजाळ,  स्किन केअरतज्ज्ञ
यावर्षी बॉडीलोशनचा खप जास्तीत जास्त वाढला असून लिपबाम यासारखे उत्पादनही लोक मोठ्या प्रमाणावर विकत घेत आहे. गतवर्षीपेक्षा साधारण ५ ते ६ टक्के अशी या उत्पादनात वाढ झाली आहे.  - श्रीराम काळे,  मेडिकल व्यावसायिक

Web Title: Various baudolation markets for skin protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.