लोककल्याणासाठी वैदिकांनी सक्रिय रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:31 AM2019-01-11T01:31:39+5:302019-01-11T01:32:06+5:30

वेद हे अपौरुषीय आहेत. वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करण्याबरोबरच वैदिकांनी आपले आचरण शुद्ध ठेवून लोककल्याणासाठी सक्रिय व्हावे, असे प्रतिपादन कर्नाटकस्थित दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदापीठ येथील जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले.

Vaidiks should be active for the welfare of the people | लोककल्याणासाठी वैदिकांनी सक्रिय रहावे

ब्रह्मरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी शंकराचार्य विधुशेखर भारती. समवेत पुरस्कारार्थी वेदमूर्ती अमरदीप कुरूंभट्टे, वैभव मांडे, शुभम जोशी, अक्षय जोशी, श्रीकृष्ण जोशी, सतीश शुक्ल, मुकुंद कुलकर्णी, उदयकुमार मुंगी, विजय साने, भानुदान शौचे, आशिष कुलकर्णी, धनंजय बेळे, प्रमोद भार्गवे, माधवराव भणगे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देशंकराचार्य भारती : ब्रह्मरत्न पुरस्काराचे वितरण

पंचवटी : वेद हे अपौरुषीय आहेत. वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करण्याबरोबरच वैदिकांनी आपले आचरण शुद्ध ठेवून लोककल्याणासाठी सक्रिय व्हावे, असे प्रतिपादन कर्नाटकस्थित दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदापीठ येथील जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले.
काळाराम मंदिर येथील उपवन इमारतीत महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने चारही वेदांचे युवा वैदिक विद्वानांचा शंकराचार्यांच्या हस्ते ब्रह्मरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

वेदपाठशाळेला १ लाख
महर्षि वेद विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असेले वेद अध्ययानाचे कार्य व्यापक झाले पाहिजे तसेच गुरू शिष्य परंपरा पुढे गेली पाहिजे अशी अपेक्षा शंकराचार्यांनी व्यक्त केली व वेद प्रसाराला पाठबळ देण्यासाठी शृंगेरी पीठाच्या माध्यमातून एक रूपयांचे अनुदान देण्यात आले.

Web Title: Vaidiks should be active for the welfare of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.