नाशिक जिल्ह्यातील कवींचा मुंबईत अनोखा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:42 PM2017-12-26T15:42:35+5:302017-12-26T15:44:05+5:30

Unique honors to poets of Nashik district | नाशिक जिल्ह्यातील कवींचा मुंबईत अनोखा सन्मान

नाशिक जिल्ह्यातील कवींचा मुंबईत अनोखा सन्मान

googlenewsNext
ठळक मुद्देआलेल्या हजारो कवितांमधून १५० कवितांचे पोस्टर प्रदर्शन प्रदर्शनाला भेट देणाºया असंख्य रसिक वाचकांनी या कवितांचा आस्वाद घेत कौतुक

नाशिक : महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रकाशन संस्था ग्रंथालीच्या वर्धापनानिमित्त पार पडलेल्या ‘वाचक दिन’ सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील सहा कवींच्या कवितांचे फलक झळकल्याने नाशिककर कवींचा अनोखा सन्मान मुंबईत झाला आहे.
मुंबई येथील दादरच्या प्रख्यात कीर्ती महाविद्यालयात २४ आणि २५ डिसेंबर या कालावधीत झालेल्या सोहळ्यात विविध उपक्र म आयोजित करण्यात आले. त्यात कविता फलक प्रदर्शन या उपक्र मासाठी ‘ग्रंथाली’ने राज्यभरातील कवींकडून कविता मागविल्या होत्या. आलेल्या हजारो कवितांमधून १५० कवितांचे पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमस्थळी लावण्यात आले आहे. त्यात राज्यातील अनेक मान्यवर कवींच्या कवितांमध्ये नाशिक जिल्ह्यातील विख्यात कविवर्य किशोर पाठक, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर, सिद्धहस्त कवी संजय चौधरी, गीतकार आणि मुखपृष्ठकार विष्णू थोरे, मूळचे वºहाडातील आणि सध्या नाशिककर असलेले कवी रवींद्र दळवी, कवी रवींद्र मालुंजकर यांच्या कवितांचे आकर्षक फलक प्रदर्शित करण्यात आले. प्रदर्शनाला भेट देणाºया असंख्य रसिक वाचकांनी या कवितांचा आस्वाद घेत कौतुक केले. नाशिकच्या कवी आणि कवितांचे मुंबईत झालेल्या या अनोख्या सन्मानाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Web Title: Unique honors to poets of Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.