भूमिगत गटारीचे घाण पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:35 AM2019-04-26T00:35:56+5:302019-04-26T00:36:26+5:30

वडाळागावातील शंभर फुटी रस्त्यालगत मनपा घरकुलासमोर भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Underground drainage dirt water on the road | भूमिगत गटारीचे घाण पाणी रस्त्यावर

भूमिगत गटारीचे घाण पाणी रस्त्यावर

Next

इंदिरानगर : वडाळागावातील शंभर फुटी रस्त्यालगत मनपा घरकुलासमोर भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधी मनपाच्या संबंधित विभागाला अनेक वेळेस तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वडाळागावातील घरकुल योजनेसमोरील शंभर फुटी रस्त्यावरून दिवसभर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते,
तसेच घरकुल योजना व समोर
नागरी वस्तीत शेकडोंच्या संख्येने नागरिक राहतात.
गावात नेहमीच भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. त्यामुळे पादचाऱ्यांना नाक दाबून मार्गक्र मण करावे लागत आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाच्या संबंधित विभागाला अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Underground drainage dirt water on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.