नांदूर गावातील जुगार अड्ड्यावरील छाप्यात चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 04:41 PM2018-11-19T16:41:34+5:302018-11-19T16:42:02+5:30

नाशिक : नांदूर गावातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या पंधरा जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोबाइल, दुचाकी, रिक्षा व जुगाराचे साहित्य असा तीन लाख ९५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

undefined | नांदूर गावातील जुगार अड्ड्यावरील छाप्यात चार लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदूर गावातील जुगार अड्ड्यावरील छाप्यात चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देआडगाव पोलीस ठाणे : १५ संशयित ताब्यात

नाशिक : नांदूर गावातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या पंधरा जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोबाइल, दुचाकी, रिक्षा व जुगाराचे साहित्य असा तीन लाख ९५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नांदूर गावातील दर्ग्याशेजारी असलेल्या प्रशांत निकम यांच्या घरात जुगार सुरू असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी संशयित सागर भोजने (रा. रामायण अपार्टमेंट, जेलरोड), सुनील चव्हाण (रा. संतनगर, दसक), कानिफ सातभाई ( रा. नरहरीनगर, दसक), राजू पगार (रा. मोरे मळा, जेलरोड), किरण भालेराव (रा. मंगलमूर्तीनगर, जेलरोड), रमेश सूर्यवंशी (रा. पंचक गाव), शकील (रा. मंगलमूर्तीनगर, जेलरोड), उत्तम पगार (रा. गणपतनगर, नांदूर नाका), राजेश पटेल ( रा. वैशालीनगर, जेलरोड), शंकर बहिवाल (रा. संत नरहरीनगर, जेलरोड), सूरज चोरमले, विशाल धनराळे, राजेंद्र सोनवणे (तिघे रा. साईनगर,नांदूर गाव), विक्रम बोराडे (रा. चरणदास मार्केटजवळ, जेलरोड) व विवेक रसाळ (रा. वीर सावरकरनगर, जेलरोड) हे पत्त्याच्या कॅटवर पैसे लावून जुगार खेळत होते़

आडगाव पोलिसांनी या सर्व संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चार लाखांचा मुद्देमाल जप्त
आडगाव पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून १ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी, ८५ हजार रुपये किमतीची रिक्षा, ४५ हजार रुपये किमतीचे १४ मोबाइल, ६८ हजार ३४० रुपयांची रोकड व १ हजार ८०० रुपयांचे पत्त्याचे कॅट असा तीन लाख ९५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पोलीस ठाण्यांमध्ये नवीन वसुली अधिकारी
पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील ४० कलेक्टर अर्थात वसुली अधिका-यांची बदली केली होती़ मात्र, या बदलीनंतर आता वसुली अधिका-यांची दुसरी फळी विविध पोलीस ठाण्यांमध्ये तयार झाली असून, त्यांच्या कृपाशीर्वादाने अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे़

Web Title: undefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.