"प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी", नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महाशिबिराला प्रारंभ 

By संजय पाठक | Published: January 23, 2024 11:45 AM2024-01-23T11:45:03+5:302024-01-23T11:45:58+5:30

जय भवानी जय शिवाजी तसेच उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

"Uddhav Thackeray Modest like Prabhu Ramchandra", Thackeray faction's grand camp begins in Nashik | "प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी", नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महाशिबिराला प्रारंभ 

"प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी", नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महाशिबिराला प्रारंभ 

नाशिक - शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आधिवेधनाला नाशिक शहरातील हॉटेल डेमोक्रॉसी येथे प्रारंभ होत असून पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नुकतेच मंचावर आगमन झाला. 

जय भवानी जय शिवाजी तसेच उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे, स्व बाळासाहेब ठाकरे तसेच माँ साहेब मीनाताई ठाकरे आणि भारत मातेचे पूजन करण्यात आले.

यावेळी ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. कार्यक्रमात खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सुभाष देसाई, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या अन्य नेते उपस्थित आहेत.

प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी - संजय राऊत
प्रभू रामचंद्र यांचे शिवसेनेशी नाते आहे. शिवसैनिक अयोध्येत गेले नसते तर श्री रामाची प्रतिष्ठापणा झाली नसती. काल पंतप्रधान हे त्यामुळेच श्री रामाची प्रतिष्ठापणा करू शकले. नाशिक ही कुरुक्षेत्राची भूमी येथून रामाने संघर्ष सुरू केला. प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी असल्याचे मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच, मी कल्याणला नुकतेच गेलो तेथे उद्धव ठाकरे यांचे असे स्वागत झाले, जणू श्री अयोध्येत प्रभू रामाचे झाले होते. रामाच्या हातात धनुष्यबाण आहे, आता मला वाटतं रामाच्या हाती मशाल येईल, असे संजय राऊत म्हणाले.
 

Web Title: "Uddhav Thackeray Modest like Prabhu Ramchandra", Thackeray faction's grand camp begins in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.