टाईपरायटरची टक टक झाली शांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 05:22 PM2017-08-13T17:22:05+5:302017-08-13T17:22:11+5:30

इंटरनेटच्या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी मोठी क्रांती घडवून आणली असून जग जवळ आले आहे. यामुळे काळानुरूप ‘टाईपरायटर’ इतिहासजमा झाले. कारण शासकिय स्तरावर परिषदेच्या वतीने आता टंकलेखन परिक्षा संगणकावरुनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Typewriter tucked down | टाईपरायटरची टक टक झाली शांत...

टाईपरायटरची टक टक झाली शांत...

Next

नाशिक : इंटरनेटच्या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी मोठी क्रांती घडवून आणली असून जग जवळ आले आहे. यामुळे काळानुरूप ‘टाईपरायटर’ इतिहासजमा झाले. कारण शासकिय स्तरावर परिषदेच्या वतीने आता टंकलेखन परिक्षा संगणकावरुनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे टाईपरायटरच्या ‘टक-टक’ला पुर्णविराम मिळाला.
राज्यातील शासकिय व निमशासकिय कार्यालयांमध्ये लिपिक, टंकलेखक पदावरील नियुक्तीसाठी राज्य परीक्षा परिषदेची टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. टाईपरायटर कालबाह्य होणे सहाजिकच होते. त्यामुळे शिक्षण विभागानेही आता यापुढे टंकलेखनाची परीक्षा संगणकावर घेतल्या जाऊन आधुनिक युगाबरोबर चालण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला आहे. २०१३सालीच शासनाने टंकलेखनाची परीक्षा संगणकामार्फत घेण्याचा विचार केला होता; मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल चार वर्षे लोटली. चालू वर्षापासून मात्र टंकलेखनाची परीक्षा संगणकावरुन कायमस्वरुपी घेतली जाणार आहे. १८आॅगस्टपासून टंकलेखनाच्या संगणकीकृत परीक्षेला प्रारंभ होत आहे. टाईपरायटरवरील अखेरची परीक्षा सात आॅगस्टपासून सुरू होती. त्याचा शेवट शनिवारी झाला. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमधील टंकलेखनाच्या संगणकावरील अभ्यासक्रमामध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. टंकलेखनाची वेगमर्यादाही तेवढीच ठेवण्यात आली आहे.
एकूणच संगणकाचे प्रस्थ पुर्णपणे निर्माण होईपर्यंत आपले अस्तित्व टिकविणाºया टाईपरायटरची आता मात्र एक्झिट’ झाल्याने टायपिंग इन्स्टिट्यिूटमध्येही टंकलेखनाचे धडे संगणकावरच दिले जाणार आहे. त्यामुळे संगणकीकृत टायपिंग इन्स्टिट्यूट असे नामकरण होण्याची यापुढे शक्यता आहे. काळानुरूप या बदलाचा स्विकार करणे स्वभाविक आहे. त्यामुळे बहुतांश इन्स्टिट्यूटमध्येही टाईपरायटर यंत्र हे एक संग्रही म्हणून बघावयास मिळणार आहे.

Web Title: Typewriter tucked down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.