ज्युस प्यायल्यामुळे घडला प्रकार : पालकांनी शिक्षक, कर्मचाºयांना धरले धारेवर १५ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:05 AM2018-01-20T01:05:27+5:302018-01-20T01:06:35+5:30

नाशिक : जे.डी.सी. बिटको हायस्कूलमध्ये जळगावच्या ज्युस कंपनीकडून विद्यार्थ्यांना मोफत ‘फ्रु टु गो’ मॅँगो ज्युसचे वाटप करण्यात आलेले ज्युस पिल्याने १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

Type of Juice Drinking Type: Parents Hold Teacher, Employees | ज्युस प्यायल्यामुळे घडला प्रकार : पालकांनी शिक्षक, कर्मचाºयांना धरले धारेवर १५ विद्यार्थ्यांना विषबाधा

ज्युस प्यायल्यामुळे घडला प्रकार : पालकांनी शिक्षक, कर्मचाºयांना धरले धारेवर १५ विद्यार्थ्यांना विषबाधा

Next
ठळक मुद्देप्रत्येक वर्गात ज्युसच्या पाऊचचे वाटप उलट्या व छातीत दुखण्याचा त्रास

नाशिकरोड : जे.डी.सी. बिटको इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शुक्रवारी दुपारी जळगावच्या एका ज्युस कंपनीकडून विद्यार्थ्यांना मोफत ‘फ्रु टु गो’ मॅँगो ज्युसचे वाटप करण्यात आलेले पाऊचमधील ज्युस पिल्याने १५ लहान विद्यार्थ्यांना मळमळ होऊन उलट्या होऊन विषबाधा झाली. त्या विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. शाळा सुटताना सदर प्रकार पालकांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षक व कर्मचाºयांना धारेवर धरले होते.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जे.डी.सी. बिटको इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये ८-१० दिवसांपूर्वी जळगावच्या एका ज्युस कंपनीचे अधिकारी, कर्मचारी विद्यार्थ्यांना जाहिरातीच्या उद्देशाने ‘फ्रु टु गो’ हे मॅँगो ज्युस मोफत वाटण्यासाठी प्राचार्य एस.डी. डोंगरे यांच्याकडे परवानगी मागण्यासाठी आले होते. तसे पत्र देखील त्यांनी शाळेला दिले आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास फ्रु टु गो ज्युस कंपनीचे चार-पाच अधिकारी, कर्मचारी विद्यार्थ्यांना मोफत ९० ग्रॅम वजनाचे मॅँगो ज्युस पाऊस वाटण्यासाठी प्राचार्यांची परवानगी घेऊन पाचवी ते दहावी पर्यंतच्या प्रत्येक वर्गात जाऊन ज्युसच्या पाऊचचे वाटप केले. काही वर्गात विद्यार्थ्यांना दोन पाऊचचे वाटप करून कर्मचारी निघून गेले. त्यानंतर मॅँगो ज्युसचे पाऊच काही विद्यार्थ्यांनी पिल्यानंतर काही वेळाने पाचवी व सहावीतील काही विद्यार्थी व विद्यार्थिनींना मळमळ, उलट्या व छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने सर्वांचे धाबे दणाणले. तत्काळ सर्व वर्गातील विद्यार्थ्यांकडून ज्युसचे पाऊच शिक्षक व कर्मचाºयांनी जमा करून कचरापेटीत टाकले. १५-१६ लहान विद्यार्थ्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना लागलीच शाळेच्या समोरील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना औषधे देण्यात आली. काही वेळानंतर विद्यार्थ्यांना चांगले वाटू लागल्यानंतर शिक्षक, कर्मचारी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन आले.
पालक झाले संतप्त
विद्यार्थ्यांना ज्युस पिऊन त्रास होऊ लागल्यानंतर शाळेने पालकांना याबाबत कुठलीही माहिती दिली नाही. शाळा सुटण्याच्या वेळेस पालक शाळेत आले असता पाल्यांनी घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. ज्या विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाला त्यांचे व इतर पालकांनी प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरले. ज्युस जाहिरातीकरिता विद्यार्थ्यांचा वापर करणे चुकीचे आहे, शाळेने परवानगी दिलीच कशी असे विविध प्रश्न उपस्थित केल्याने शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी वाहतुक करणाºया वाहनांतुन विद्यार्थी घरी गेल्यानंतर त्यांनी पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालक सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत शाळेत जाऊन विचारपुस करून संताप व्यक्त करत होते. सदर घटनेची माहिती पोलिसंना मिळताच उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी शाळेत धाव घेऊन याबाबत विचारपूस करून माहिती घेतली.

Web Title: Type of Juice Drinking Type: Parents Hold Teacher, Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.