ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार जागीच ठार ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:49 PM2017-12-20T12:49:20+5:302017-12-20T12:49:56+5:30

सटाणा : अज्ञात ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार जागीच ठार झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सटाणा मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळी नजीक घडली .

Two-wheeler seized by a tractor and a constable killed on the spot. Government funeral funeral | ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार जागीच ठार ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार जागीच ठार ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

googlenewsNext

सटाणा : अज्ञात ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार जागीच ठार झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सटाणा मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळी नजीक घडली .याप्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील भाक्षी रोडवरील शरदनगरचे रहिवाशी व मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल बन्सीलाल अहिरे (३९) हे आपल्या कर्तव्यावरून बुलेट मोटरसायकलने (एमएच ४१-९४४५) रात्री मालेगाव येथून सटाण्याकडे परतीच्या मार्गावर असतांना जुनीशेमळी नजीक समोरून येणाºया टॅÑक्टरने समोरून जबर धडक दिल्याने अहिरे दुचाकीसह ट्रक्टरखाली सापडले.त्यांचे डोके चाकाखाली आल्याने ते जागीच ठार झाले. टॅÑक्टर मात्र पसार झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे ,नंदू पगार , मनसेचे पंकज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अहिरे यांना तत्काळ सटाणा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले.मात्र त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.घटनेचे वृत्त कळताच अहिरे यांचे नातेवाइक ,मित्रपरिवाराने ग्रामीण रु ग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती.याप्रकरणी सटाणा पोलिसांत अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरु द्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अहिरे यांच्या अपघाती निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अहिरे यांच्या पश्चात सेवानिवृत्त सहाय्यक उपनिरीक्षक बन्सीलाल अहिरे ,आई , पत्नी , मुलगा ,मुलगीअसा परिवार आहे. पोलीस हवालदार अहिरे हे मूळ देवळा तालुक्यातील वासोळ येथील रहिवासी आहेत.त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी दुपारी येथील ताहाराबाद रस्त्यावरील आमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी पोलिसांनी तीन फैरी झाडून अहिरे यांना मानवंदना दिली.यावेळी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे ,सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील ,उपनिरीक्षक गणेश बुवा ,कृष्णा घायवट , पुंडलिक डांबाळे ,संदीप गांगुर्डे यांच्यासह नगराध्यक्ष सुनील मोरे आदीनी श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Two-wheeler seized by a tractor and a constable killed on the spot. Government funeral funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक