सिन्नरजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:24 AM2018-02-24T00:24:22+5:302018-02-24T00:24:22+5:30

सिन्नर - संगमनेर रस्त्यावर संगमनेर नाक्याजवळ अज्ञात वाहनावर धडकून सोनांबे येथील तरुण दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.

Two-wheeler killed in an accident near Sinnar | सिन्नरजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार

सिन्नरजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार

Next

सिन्नर : सिन्नर - संगमनेर रस्त्यावर संगमनेर नाक्याजवळ अज्ञात वाहनावर धडकून सोनांबे येथील तरुण दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.  सोनांबे येथील नवनाथ रुंजा पवार (२६) व रोहित बाळू जगताप (२७) हे स्कूटीने (क्र. एमएच १५ जीपी ९६४४) सिन्नरच्या दिशेने येत असताना सदर अपघात झाला. यात नवनाथ पवार या युवकाचा मृत्यू झाला तर रोहित जगताप जखमी झाला असून, त्याच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in an accident near Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.