दोन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:53 AM2019-05-18T00:53:26+5:302019-05-18T00:53:42+5:30

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा दरम्यान रेल्वेच्या कामासाठी रविवारी (१९ मे) साडेतीन तासांचा ब्लॉक घेण्यात आल्याने शनिवारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर व रविवारची मुंबई-भुसावळ पॅसेंजर, गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे उशिराने व मार्गात बदल करून धावणार आहेत.

 Two train trains canceled for two days | दोन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

दोन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

Next

नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा दरम्यान रेल्वेच्या कामासाठी रविवारी (१९ मे) साडेतीन तासांचा ब्लॉक घेण्यात आल्याने शनिवारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर व रविवारची मुंबई-भुसावळ पॅसेंजर, गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे उशिराने व मार्गात बदल करून धावणार आहेत.
शनिवार (१८ मे) भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे, तर रविवार (१९ मे) मुंबई-भुसावळ पॅसेंजर, गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.  रविवारी (१९ मे) पुणे-भुसावळ पॅसेंजर ही पनवेल, कल्याण ऐवजी दौंड-मनमाडमार्गे भुसावळला जाणार आहे.
उशिरा धावणाऱ्या रेल्वे
रविवार (१९ मे )एलटीटी-मुजफ्फर एक्स्प्रेस दुपारी १२.१५ ऐवजी दीड वाजता सुटेल. मुंबई-हावडा एक्स्प्रेस सकाळी ११.०५ ऐवजी दुपारी ३ वाजता, एलटीटी-गोरखपूर सकाळी १०.५५ ऐवजी दुपारी अडीच वाजता, एलटीटी-गोरखपुर सकाळी ११.१० ऐवजी दुपारी ३ वाजता, मुंबई-नागपूर हॉलीडे स्पेशल सकाळी ११.३० ऐवजी दुपारी ३.३५ वाजता, एलटीटी-वाराणसी दुपारी १२.४० ऐवजी दुपारी २.१० वाजता, मुंबई-जबलपूर एक्स्प्रेस दुपारी दीड ऐवजी १.४५ वाजता, मुंबई-अलाहाबाद हॉलीडे स्पेशल ४.४० ऐवजी सोमवार (२० मे) दुपारी १२.२० वाजता, जालना-दादर जनशताब्दी जालन्याहून पहाटे ४.४५ ऐवजी सकाळी ७.४५ वाजता सुटेल. तसेच शनिवारी (१८ मे) नापूरहून सुटणारी मुंबई-सेवाग्राम एक्स्प्रेस ही नाशिकरोडपर्यंतच धावणार आहे. रविवार (१९ मे) मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबई ऐवजी नाशिकवरून तिच्या निर्धारित वेळेला सुटून नागपूरला जाणार आहे. शनिवार (१८ मे) वाराणसी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस ही दादरपर्यंतच धावणार आहे.

Web Title:  Two train trains canceled for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.