निमगाव (वा.) ला दोन मोटारसायकली जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:09 AM2019-01-11T01:09:33+5:302019-01-11T01:09:50+5:30

गाड्या जाळण्याचे लोण नाशिकपाठोपाठ ग्रामीण भागातही पोहोचले आहे. लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथे दोन मोटारसायकली जाळल्याची घटना गुरु वारी पहाटे उघडकीस आली.

Two motorcycles were burnt to Nimgaon (V) | निमगाव (वा.) ला दोन मोटारसायकली जाळल्या

निमगाव (वा.) ला दोन मोटारसायकली जाळल्या

Next

लासलगाव : गाड्या जाळण्याचे लोण नाशिकपाठोपाठ ग्रामीण भागातही पोहोचले आहे.
लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथे दोन मोटारसायकली जाळल्याची घटना गुरु वारी पहाटे उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भागवत एकनाथ दरेकर रा. निमगाव वाकडा यांच्या घरासमोर लावलेली होंडा सिटी हंड्रेड ही मोटरसायकल (क्र . एम एडब्ल्यू ८०३९) तसेच हीरोहोंडा सुपर स्प्लेंडर ही मोटरसायकल (क्र . एमएच १५ बीटी ५००६) अशा दोन दुचाकी लावलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने दुचाकींच्या पेट्रोल टाकीची नळी काढून पेट्रोल गाडीवर व जमिनीवर ओतून देत दोन्ही दुचाकींना आग लावली.
या आगीत दोन्ही दुचाकी जळून मोठे नुकसान झाले. याप्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आह.े सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मोहरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two motorcycles were burnt to Nimgaon (V)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.