ग्रामपंचायत विभागाचे दोन कोटी रुपये गेले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:17 AM2019-02-12T00:17:01+5:302019-02-12T00:26:36+5:30

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत सन २०१६-१७ मधील विविध योजनांसाठी जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आलेली सुमारे दोन कोटी सतरा लाख रुपयांची रक्कम अखर्चित राहिल्याने शासनाकडे जमा झाली आहे. ज्या कामांसाठी रक्कम मंजूर होती त्या कामांचे प्रस्ताव पुन्हा शासनाला सादर करून निधी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Two crore rupees were returned to the Gram Panchayat Department | ग्रामपंचायत विभागाचे दोन कोटी रुपये गेले परत

ग्रामपंचायत विभागाचे दोन कोटी रुपये गेले परत

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : परत गेलेल्या अखर्चित रकमेसाठी शासनाला पुन्हा प्रस्ताव सादर करावा लागणार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत सन २०१६-१७ मधील विविध योजनांसाठी जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आलेली सुमारे दोन कोटी सतरा लाख रुपयांची रक्कम अखर्चित राहिल्याने शासनाकडे जमा झाली आहे. ज्या कामांसाठी रक्कम मंजूर होती त्या कामांचे प्रस्ताव पुन्हा शासनाला सादर करून निधी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
सन २०१६-१७ मध्ये जिल्हा बँकेच्या संशयास्पद कामांवरून रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेच्या व्यवहारावर नियंत्रण आणल्यामुळे जिल्हा बँकांमार्फत होणारे जिल्हा परिषदेचे अनेक व्यवहार ठप्प झाले होते. त्याची झळ आजही बसत असून, सन २०१६-१७ मध्ये मंजूर झालेल्या कामांची रक्कम जिल्हा बँकेत पडून राहिल्याने सदर रक्कम शासनाकडे जमा झाली आहे. वास्तविक ज्या कामांसाठी निधी मंजूर होता त्यातील बरीचशी कामे पूर्णत्वास आली आहे तर काही कामे अर्धवटस्थितीत आहेत. मात्र या कामांसाठी निधीचा पाठपुरावा करण्यात न आल्यामुळे सदर रक्कम जिल्हा बँकेत पडून राहिल्याने नियमानुसार दोन वर्ष निधी खर्चित न झाल्याने सदर निधी शासनाकडे वर्ग करावा लागला आहे.
ग्रामपंचायत विभागाकडून यात्रास्थळ, आदिवासी, बिगर आदिवासी, नागरी सुविधा, जनसुविधा, अल्पसंख्याक अशा विविध योजना राबविल्या जातात.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सहा योजनांसाठी जिल्हा बँकेकडे दोन कोटी सतरा लाख १६ हजार ६९४ इतकी रक्कम विविध मंजूर कामांसाठी जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आली होती. मात्र पंचायत समित्यांकडून सदर निधीची मागणी न करण्यात आल्यामुळे हा निधी शासनाकडे वर्ग झाला आहे.

Web Title: Two crore rupees were returned to the Gram Panchayat Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.