मोकभणगी शिवारात आढळले दोन बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:57 AM2018-02-22T00:57:01+5:302018-02-22T00:57:19+5:30

तालुक्यातील मोकभणगी शिवारात मंगळवारी रात्री दोन बिबट्याचे बछडे सापडले. मोकभणगी शिवार व परिसरात बिबट्याची नर व मादी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा,

 Two calves found in mokbhangai Shiva | मोकभणगी शिवारात आढळले दोन बछडे

मोकभणगी शिवारात आढळले दोन बछडे

Next

कळवण : तालुक्यातील मोकभणगी शिवारात मंगळवारी रात्री दोन बिबट्याचे बछडे सापडले. मोकभणगी शिवार व परिसरात बिबट्याची
नर व मादी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मोकभणगीचे सरपंच प्रकाश पवार, लोटन गांगुर्डे व परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मोकभणगी येथे दोन
बछडे आढळून आले. येथील शेतकºयांनी व गावातील काही युवकांनी कळवण येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून दोन बछडे वनविभागाच्या ताब्यात दिले.  अनेक शेतकरी बांधवांना बिबट्याचे दर्शन घडल्याचे शेतकºयांनी सांगितले.

Web Title:  Two calves found in mokbhangai Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.