आॅनलाइन रोलेट जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:35 AM2018-06-21T00:35:26+5:302018-06-21T00:35:26+5:30

मोबाइलद्वारे आॅनलाइन रोलेट जुगार खेळणाºया चौघा संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने ताब्यात घेतले आहे़ मनोहर भाऊराव गायकवाड (३७, रा. नांदूरनाका), अजय रामभाऊ बोरुडे (३२, रा. मुंबईनाका), विवेक पोपट देशमुख (४५, रा. राणेनगर) आणि गालीब सादिक शेख ऊर्फ बब्बू (४०, रा. जुने नाशिक) अशी ताब्यात घेतलेल्या जुगाºयांची नावे असून, त्यांच्याकडून ८२ हजार ५०० रुपयांचे पाच मोबाइल जप्त केले आहेत़

 Two arrested in the online roulette gambling | आॅनलाइन रोलेट जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक

आॅनलाइन रोलेट जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक

Next

नाशिक : मोबाइलद्वारे आॅनलाइन रोलेट जुगार खेळणाºया चौघा संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने ताब्यात घेतले आहे़ मनोहर भाऊराव गायकवाड (३७, रा. नांदूरनाका), अजय रामभाऊ बोरुडे (३२, रा. मुंबईनाका), विवेक पोपट देशमुख (४५, रा. राणेनगर) आणि गालीब सादिक शेख ऊर्फ बब्बू (४०, रा. जुने नाशिक) अशी ताब्यात घेतलेल्या जुगाºयांची नावे असून, त्यांच्याकडून ८२ हजार ५०० रुपयांचे पाच मोबाइल जप्त केले आहेत़  युनिट-२ मधील पोलीस शिपाई बाळा नांद्रे यांना मिळालेल्या माहितीनुसार मुंबईनाका परिसरातील जुने विशाल मेगा मार्ट इमारतीच्या पार्किंगमध्ये मोबाइलवर रोलेट जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि़ १८) सांयकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सुरेल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटच्या समोरील पार्किंगमध्ये छापा टाकला़  यावेळी संशयित गायकवाड, बोरुडे, देशमुख व शेख हे मोबाइलमध्ये फन रोलेट नावाचा जुगार खेळत होते़  पोलिसांनी या चौघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ८२ हजार ५०० रुपयांचे पाच मोबाइल जप्त केले आहेत़ या संशयितांविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सहारे, विजय लोंढे, हवालदार श्रीराम सपकाळ, पोलीस नाईक संजय ताजणे, देवकिसन गायकर, नितीन भालेराव, पोलीस शिपाई योगेश सानप, महेंद्र साळुंखे, विजय पगारे आणि संतोष ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली़

Web Title:  Two arrested in the online roulette gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.