ईन्शी शाळेला लोकसहभागातून टीव्ही संच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 03:43 PM2019-07-19T15:43:43+5:302019-07-19T15:45:28+5:30

सामाजिक पुढाकार : ग्रामस्थांकडून मदतीचा हात

TV set from people's participation in Ichshi school | ईन्शी शाळेला लोकसहभागातून टीव्ही संच

ईन्शी शाळेला लोकसहभागातून टीव्ही संच

googlenewsNext
ठळक मुद्देईन्शी गावातील सरकारी कर्मचारी व शाळेतील माजी विद्यार्थी यांनी उन्हाळी सुट्टीत एकत्र येऊन व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले

देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यातील ईन्शी येथील जि. प. प्राथमिक शाळेला लोकसहभागातून चार एलईडी टिव्ही संचांचा लोकार्पण सोहळा गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील जयम फाऊंडेशनचे डॉ. अश्विनकुमार भारद्वाज, पंकज दशपुते, शिक्षण विस्तार अधिकारी शितल कोठावदे, केंद्र प्रमुख केदा पगार , चित्रकार भारत पवार, साहेबराव बहिरम आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. भारद्वाज यांनी शाळा परिसराची पाहणी करून कृषी विषयक उपक्र म व शालेय उद्यान उभारण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ईन्शी गावातील सरकारी कर्मचारी व शाळेतील माजी विद्यार्थी यांनी उन्हाळी सुट्टीत एकत्र येऊन व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले असता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. इन्शी गावातील मूळ रहिवासी असलेले आरकेएम शाळेचे सेवानिवृत्त प्रा.के.के.शिंदे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी पाच हजार रु पयांचा धनादेश दिला. तसेच ग्रामस्थांनीही मदतीचा हात पुढे केला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट भोये , माजी सरपंच रमेश महाले ,रंगनाथ पवार, पोलीस पाटील तुळशीराम पवार, विजय महाले ,पंढरीनाथ महाले, भरत बागूल,शिवाजी जगताप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन निलेश भामरे यांनी केले तर उत्तम चौधरी यांनी आभार मानले.

 

Web Title: TV set from people's participation in Ichshi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक