तुकाराम मुंढे : जुन्या नाशकातील जीर्ण वाडे पोलीस बंदोबस्तात रिकामे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 05:45 PM2018-08-06T17:45:10+5:302018-08-06T17:46:46+5:30

पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनपा प्रशासनाला आढावा घेऊन धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भुमिकेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

Tukaram Mundhe: In old-fashioned old Kadhera district, you will empty the house | तुकाराम मुंढे : जुन्या नाशकातील जीर्ण वाडे पोलीस बंदोबस्तात रिकामे करणार

तुकाराम मुंढे : जुन्या नाशकातील जीर्ण वाडे पोलीस बंदोबस्तात रिकामे करणार

Next
ठळक मुद्दे एकूण ३९७ धोकादायक वाडे, घरांचा सर्वे पुर्ण मुंढे यांनी धोकादायक वाडे तातडीने रिकामे करण्याचा निर्णय बोलून दाखविला

नाशिक : जुने नाशिक-पंचवटी परिसरातील २८५ आणि संपुर्ण शहरातील मिळून एकूण ३९७ धोकादायक वाडे, घरांचा सर्वे पुर्ण होऊन महापालिका प्रशासनाकडे सर्व माहिती उपलब्ध आहे. ज्या वाड्यांचा वाद न्यायप्रविष्ट नाही व जे अत्यंत धोकादायक स्थितीत आहे, ते पोलीस बंदोबस्तात रिकामे क रण्याचा धाडसी निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बोलून दाखविला.
रविवारच्या दुर्दैवी घटनेच्या रुपाने संबंधितांवर काळाची झडप? किंवा सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष? या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली असली तरी दोघा जीवांना या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले हे निश्चित. अशा घटनांची पुनरावृत्ती भविष्यात टाळण्यासाठी जुनेनाशिककरांनाच पुढे येऊन तोडगा काढावा लागणार आहे. महापालिका प्रशासनप्रमुख मुंढे यांनी धोकादायक वाडे तातडीने रिकामे करण्याचा निर्णय बोलून दाखविला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनपा प्रशासनाला आढावा घेऊन धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भुमिकेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

Web Title: Tukaram Mundhe: In old-fashioned old Kadhera district, you will empty the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.