देवळा येथे शहीदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 04:08 PM2019-02-16T16:08:23+5:302019-02-16T16:14:20+5:30

देवळा : पुलवामा येथे दहशतवादी हल्यात ४४ जवान शहीद झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून देवळा येथे शनिवारी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळत निषेध केला. येथील पाच कंदील चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात येवून सर्वपक्षीयांच्यावतीने शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Tribute to the martyrs at Deola | देवळा येथे शहीदांना श्रद्धांजली

देवळा येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतांना सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक.

Next
ठळक मुद्देव्यावसायिकांनी आपले व्यवहार ठेवले बंद ; पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

देवळा : पुलवामा येथे दहशतवादी हल्यात ४४ जवान शहीद झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून देवळा येथे शनिवारी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळत निषेध केला. येथील पाच कंदील चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात येवून सर्वपक्षीयांच्यावतीने शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
पाकीस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्याचा, तसेच शहरात प्रभातफेरी काढून शहीदांच्या कुटुंबियांसाठी मदत जमा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. विश्राम निकम, उदयकुमार अहेर, संजय अहेर, जयंत आहीरराव, योगेश अहेर, किशोर चव्हाण, पंकज आहीरराव, पंडीत निकम आदींनी मनोगत व्यक्त केले. पाकीस्तानला धडा शिकवा, काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करा, अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
शहरातील सामाजिक संस्था व नागरीकांनी यावेळी शहीदांना आर्थिक मदत जाहीर केली. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भारीप बहुजन महासंघ, आरपीआय, देवळा तालुका ग्राहक पंचायत, देवळा तालुका वारकरी संप्रदाय, तांबोळी जमात, डॉक्टर व मेडीकल असोशिएशन आदींसह मुस्लीम समाज बांधव व सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी संभाजी आहेर, योगेश आहेर, सुनील पवार, मनोज अहेर, अतुल पवार, सुनील आहेर, जितेंद्र आहेर, लक्ष्मीकांत आहेर, डॉ. विश्राम निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर, उदयकुमार आहेर, मनोज अहेर, विश्वनाथ गुंजाळ, राजेंद्र देवरे, अशोक आहेर, अशोक सुराणा, किशोर चव्हाण, किशोर आहेर, दिलीप पाटील, दिनकर निकम, शांताराम पवार, बाळा जाधव , विलास माळी, पंकज अहिरराव, योगेश आहेर, अशोक आहेर, वैभव शिवदे, काकाजी शिंदे, गोटू शिंदे, विक्र ांत आहेर, साईनाथ पवार, राजेंद्र देवरे, आसिफ शेख, प्रदीप आहेर, बारकू कुवर, बाळासाहेब निकम, योगेश मेधने, मनोज आहेर, चेतन आहेर, किशोर पाटील, अशोक शिंदे, राजेंद्र बागुल, तुषार शिंदे, नंदू आहेर, नीलेश निकम, डॉ. प्रशांत निकम असलम तांबोळी, आसिफ शेख, नजीर मणियार, फारूक तांबोळी, मोसिन तांबोळी, मोबीन शेख, रब्बानी तांबोळी, अकील शेख, फारूक तांबोळी, इमरान तांबोळी, गुड्डू शेख इत्यादी सर्व पक्षीय व सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते.
 

Web Title: Tribute to the martyrs at Deola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Martyrशहीद