पर्यटकांनी साधली दिवाळीच्या सुटीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:47 PM2017-10-22T23:47:34+5:302017-10-23T00:19:12+5:30

दिवाळीच्या सुटीची संधी साधून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकण आणि केरळ म्हणजेच समुद्रकिनाºयाला प्राधान्य दिले आहे. महाबळेश्वर, माथेरान यांसारख्या महागड्या ठिकाणांच्या तुलनेत स्थानिक पर्यटकांनी यंदा दिवाळी सुट्यांमध्ये कोकणातील निसर्गरम्य वातावरणात रमणे पसंत केले.

 Travelers Diaspora Opportunity for Diwali Holidays | पर्यटकांनी साधली दिवाळीच्या सुटीची संधी

पर्यटकांनी साधली दिवाळीच्या सुटीची संधी

googlenewsNext

नाशिक : दिवाळीच्या सुटीची संधी साधून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकण आणि केरळ म्हणजेच समुद्रकिनाºयाला प्राधान्य दिले आहे. महाबळेश्वर, माथेरान यांसारख्या महागड्या ठिकाणांच्या तुलनेत स्थानिक पर्यटकांनी यंदा दिवाळी सुट्यांमध्ये कोकणातील निसर्गरम्य वातावरणात रमणे पसंत केले.  दिवाळीच्या सुटीत पर्यटकांची कोकणला सर्वाधिक पसंती मिळण्यामागे तेथील धार्मिक स्थळे, निसर्गरम्यता, समुद्रकिनारा, गड व किल्ले आदी पर्यटनस्थळांचा अनोखा मेळ आणि परवडणारी सहल हे प्रमुख कारण आहे. यंदाच्या दिवाळीत केरळपेक्षाही कोकणात पर्यटनासाठी जाणाºयांची संख्या अधिक आहे. दिवाळीची सुटी म्हणजे पर्यटनाचा योग हे समीकरण गेल्या काही वर्षांत चांगलेच रूजले आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनापासून काही दिवस का होईना, शांत व रमणीय परिसरात भ्रमंती करण्याची उच्चभ्रूंपुरती मर्यादित राहिलेली पर्यटनाची मौज मध्यम व उच्च मध्यमवर्गामध्येही रूजली आहे. त्यामुळे मध्यम व उच्च मध्यम वर्गातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध यात्रा कंपन्यांनी जाहीर केलेल्या वेगवेगळ्या सवलतींचा पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात लाभ उठवला. दिवाळीच्या सुटीत उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणला प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा, खंडाळा अशा नेहमीच्या पर्यटनस्थळांनाही भेटी देणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परराज्यात जाणाºया पर्यटकांनी केरळला प्रथम पसंती दिली असून, दिवाळीपूर्वीच अनेक कुटुंबांनी सहलींचे प्लॅनिंग केले होते. नाशिकहून सर्वाधिक पर्यटक कोकणात तारकर्ली, मालवण, दिवे आगर, सावंतवाडी, दापोली, गणपती पुळे या भागात पर्यटनासाठी गेले असून, पर्यटकांनी मराठवाड्यातील धार्मिक स्थळे व वेरूळ, अजिंठासारख्या लेणींनाही पसंती दिल्याचे विविध पर्यटन कंपन्यांनी सांगितले.
परदेशवारीची उत्सुकता
दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटनासाठी नाशिककरांनी कोकण किनारपट्टीला अधिक पसंती दिली. देशातील पर्यटनस्थळांमध्ये सर्वाधिक पसंती केरळला मिळाली असून, विदेशात सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबई, श्रीलंका या देशांमध्येही जाण्यासाठी नाशिककरांनी उत्सुकता दाखवली. दिवाळीचे दोन दिवस उत्सव आटोपून पर्यटक देशाटनासाठी बाहेर पडले. धार्मिक पर्यटनासाठी गुजरातसह उत्तर प्रदेश, उत्तराखंड आदी वेगवेगळ्या राज्यांतही नाशिकचे पर्यटक बाहेर पडले असून धार्मिक पर्यटनाकडेही नाशिककरांचा कल वाढला आहे.
पर्यटकांना नाशिकचे आकर्षण
स्थानिक पर्यटक परराज्यासह राज्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यास मग्न असताना परराज्यातील व महाराष्ट्राच्या इतर भागातून नाशिकमध्ये येणाºया पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. रामकुंड, सीतागुंफा, काळाराम मंदिर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सप्तशृंगी गड आदी ठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे.

Web Title:  Travelers Diaspora Opportunity for Diwali Holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.