एचएएलच्या ३९ स्थानिक कामगारांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 10:50 PM2022-06-08T22:50:19+5:302022-06-08T22:53:41+5:30

ओझर : एचएएल प्रशासनाने नाशिक विभागाच्या ३९ कामगारांची बदली नव्याने स्थापन झालेल्या तुमकुर हेलिकॉप्टर विभाग व बंगळुरू या दोन ठिकाणी केल्याने नाशिक विभागात प्रचंड असंतोष पसरला आहे.

Transfer of 39 local HAL workers | एचएएलच्या ३९ स्थानिक कामगारांची बदली

एचएएलच्या ३९ स्थानिक कामगारांची बदली

Next
ठळक मुद्देओझर : पहिली यादी प्रसिद्ध; संघटनेच्या आश्वासनाकडे लक्ष

ओझर : एचएएल प्रशासनाने नाशिक विभागाच्या ३९ कामगारांची बदली नव्याने स्थापन झालेल्या तुमकुर हेलिकॉप्टर विभाग व बंगळुरू या दोन ठिकाणी केल्याने नाशिक विभागात प्रचंड असंतोष पसरला आहे.

त्या मुद्द्यावरून नुकतीच झालेली कामगार संघटनेची निवडणूक चोहीबाजूंनी गाजली होती. एचएएल नाशिक विभागात काही वर्षांपूर्वी ३३ कामगारांची अभिहस्तांकन तत्त्वावर तर २५ जणांची इतर विभागात कायम बदली झाली. ३३ पैकी १४ कामगार पुन्हा नाशिक विभागात सक्रिय झाले. आता स्थानिक कामगारांची बदली झाल्याने तिप्पट ताकद देण्याच्या हालचाली आणखीन मंद झाली असली तरी तूर्तास कामगार संघटनेची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

निवडणुकीत हाच मुद्दा ठरला कळीचा
सहा महिन्यांपूर्वी नाशिक विभाग कामगार संघटना निवडणूक संपन्न झाली. मागील वेळी सरचिटणीस असलेले सचिन ढोमसे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा कामगारांच्या बदल्या झाल्या आणि ते सतत टीकेचे धनी होत राहिले. तोच मुद्दा पकडत निवडून आलेले सरचिटणीस संजय कुटे यांनी प्रचारादरम्यान एकही कामगारांची बदली होऊ देणार नाही याची छाती ठोक ग्वाही देत मागील वेळी बदली झालेले पंचवीस कामगार सहा महिन्यांच्या आत पुन्हा नाशिक विभागात रुजू केले जातील असा विश्वास दिला असताना कामगारांनी देखील त्यांना मताधिक्य देत सरचिटणीस केले, परंतु सद्य:स्थितीत त्यात आणखी ३९ स्थानिक कामगारांची बदली झाल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

तूमकुर विभागात बदली का?
निर्मला सीतारामन यांनी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत तूमकुर येथे हेलिकॉप्टर बनवण्याचा नवीन विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करत सुरू केला, परंतु नाशिक विभागात सर्वच उपकरणे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा तयार असताना तेथे नवीन विभाग सुरू करत नेमके काय साध्य झाले, हा मुख्य सवाल आहे. खरे तर रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना बदली हा त्याला पर्याय नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. याउलट नाशिक विभागाचे एसीएमए विमान कोईम्बतूरला हलवण्याचा घाट घातला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

प्रसिद्धिपत्रक आणि संभ्रम?
गोवा येथे बारा कामगारांची गरज असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध झाले असताना तेथूनच दोघांची बदली तुमकुर येथे झाल्याने बदली प्रक्रियेत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे.
लोकमतने टाकला होता प्रकाशझोत
नरेंद्र मोदींच्या आठ वर्षांपूर्तीच्या निमित्ताने त्यांनी नाशिकला दिलेल्या आश्वासनाचा ग्राउंड रिपोर्ट लोकमतने आठवड्यापूर्वी मांडला होता. त्याचा प्रत्यय सोमवारी (दि. ६) झालेल्या बदलीवरून आला. शिवाय नाशिक इतकी हजारो एकर जागा आणि सुविधा कुठेही नसताना याच विभागाला अपंगत्व येते की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Transfer of 39 local HAL workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.