बांबूपासून घुमटासह विविध रचना साकारण्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:25 PM2018-12-30T23:25:51+5:302018-12-30T23:26:07+5:30

मविप्रच्या वास्तुकला महाविद्यालयामधील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी २६ ते २८ डिसेंबरदरम्यान तीनदिवसीय बांबू कार्यशाळा वास्तुविशारद जयेश आपटे आणि इतर तज्ज्ञ सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

 Training to make different designs with bamboo dome | बांबूपासून घुमटासह विविध रचना साकारण्याचे प्रशिक्षण

बांबूपासून घुमटासह विविध रचना साकारण्याचे प्रशिक्षण

Next

नाशिक : मविप्रच्या वास्तुकला महाविद्यालयामधील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी २६ ते २८ डिसेंबरदरम्यान तीनदिवसीय बांबू कार्यशाळा वास्तुविशारद जयेश आपटे आणि इतर तज्ज्ञ सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.  या कार्यशाळेच्या माध्यमातून बांबू साहित्याचे गुणधर्म, वैशिष्ट्ये, उपयोग आणि प्रक्रिया करून वापरण्याजोगा बांबू यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी बांबूचे तुकडे करणे, संयुक्त साहित्याचा वापर करून जोड देणे हे स्वत: करून अनुभवले. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ तसेच प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अल्पांतरातील भौमितिक रेषा’ तत्त्वाचा वापर करून बांबूपासून २५ फूट व्यास आणि १३ फूट उंची असलेला घुमट तयार केला आहे.  बांबूपासून तयार करण्यात आलेला घुमट बहुद्देशीय वापरासाठी वापरला जाईल. कार्यशाळेसाठी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Training to make different designs with bamboo dome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक