आज ग्रहणवेधकाळातही करा गुरुपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:59 AM2019-07-16T00:59:58+5:302019-07-16T01:00:22+5:30

खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरुपौर्णिमा हे मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमेबाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा आदी करता येतात.

 Today, take the time of Guru Pujan | आज ग्रहणवेधकाळातही करा गुरुपूजन

आज ग्रहणवेधकाळातही करा गुरुपूजन

googlenewsNext

नाशिक : खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरुपौर्णिमा हे मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमेबाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा आदी करता येतात. त्यामुळे दि. १६ जुलै रोजी ग्रहण वेधकाळात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपुजन करता येईल, असा निर्वाळा सोलापूरचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी दिला आहे.
मंगळवारी (दि.१६) दुपारी ४ वाजेपासूनच खंडग्रास चंद्रग्रहणाचा वेधारंभ होणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहण आणि त्याच दिवशी गुरुपौर्णिमा आल्याने ग्रहणवेधकाळात गुरुपूजन करावे किंवा नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. त्याबाबत खुलासा करताना दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी म्हटले आहे, खंडग्रास चंद्रग्रहण हे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने तीन प्रहर आधी म्हणजेच मंगळवारी (दि.१६) दुपारी ४ वाजेपासूनच ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन मात्र निषेध आहे. ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा करता येतात. त्यामुळे ग्रहण वेधकाळातही गुरुपूजन करता येईल. तसेच पौर्णिमेनिमित्त केली जाणारी सत्यनारायणाचीही पूजा व कुलधर्म करता येईल. दुपारी ४ वाजेपर्यंत भोजन घेता येईल, मात्र सायंकाळी वेधकाळात गुरुपूजन करावयाचे असल्यास खडीसाखरेचा प्रसाद घ्यावा, अशी माहितीही दाते यांनी दिली आहे.
ग्रहणाची मुंबईतील स्थिती
वेधारंभ :
दुपारी ४ वाजेपासून (१६ जुलै)
स्पर्श :
रात्री १ वाजून ३२ मिनिटे (१७ जुलै)
मध्य :
रात्री ३ वाजून १ मिनिट (१७ जुलै)
मोक्ष :
पहाटे ४.३० वाजता (१७ जुलै)
ग्रहणपर्व :
रात्री २ वाजून ५८ मिनिटे

Web Title:  Today, take the time of Guru Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.