आजपासून बाळ येशू यात्रोत्सव तयारी पूर्ण : राज्य-परराज्यांतून भाविक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:50 AM2018-02-10T00:50:05+5:302018-02-10T00:50:55+5:30

उपनगर :नेहरूनगर येथील बाळ येशु दीड दिवसाचा यात्रोत्सव शनिवार (दि. १०) पासून प्रारंभ होत असून, यात्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

From today, the baby Jesus is preparing for the Yatra: The devotees from the state ruled state | आजपासून बाळ येशू यात्रोत्सव तयारी पूर्ण : राज्य-परराज्यांतून भाविक दाखल

आजपासून बाळ येशू यात्रोत्सव तयारी पूर्ण : राज्य-परराज्यांतून भाविक दाखल

Next
ठळक मुद्देशाळेच्या मैदानावर भव्य मंडप दुकाने थाटण्यास सुरुवात

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशु दीड दिवसाचा यात्रोत्सव शनिवार (दि. १०) पासून प्रारंभ होत असून, यात्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यात्रोत्सवाकरिता परराज्यातून ख्रिस्ती भाविक दाखल होऊ लागले आहेत.
नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसांच्या यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच ख्रिस्ती भाविकांच्या सामूहिक प्रार्थनेसाठी सेंट झेवियर शाळेच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मंदिर परिसरात ठिकठिकाणी मिस्सा अर्पण पेट्या उभारण्यात आल्या असून, मंदिराच्या बाहेर पूजेच्या साहित्यांचे अनेक दुकाने थाटण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणाºया भाविकांच्या वाहनांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने मोफत वाहनतळाची तसेच प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिराशेजारील जेतवननगर येथील मोकळ्या जागेवर विविध वस्तू, खाद्य पदार्थ, खेळणी, पूजेचे साहित्य, फळविक्रेते आदींनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. यात्रोत्सवानिमित्त परजिल्ह्यांतील, राज्यांतील भाविक दाखल होऊ लागले असून, नाशिक-पुणे महामार्गावरील हॉटेल, लॉजिंग यांचे व्यवसाय तेजीत आले आहे. यात्रोत्सवाला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तसेच नाशिक-पुणे महामार्गावर मंदिर परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांचीदेखील नियुक्ती करण्यात येणार आहे.

Web Title: From today, the baby Jesus is preparing for the Yatra: The devotees from the state ruled state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक