साकुर येथे तीन एकर ऊस खाक, दोन लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:58 PM2019-02-15T14:58:21+5:302019-02-15T14:59:26+5:30

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालूक्यातील साकुर येथे शुक्रवारी दुपारी सुमारे तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे. हा ऊस जळल्यामुळे शेतक-याचे जवळपास दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

Three acres of sugarcane at Sakur, two lakhs damaged | साकुर येथे तीन एकर ऊस खाक, दोन लाखांचे नुकसान

साकुर येथे तीन एकर ऊस खाक, दोन लाखांचे नुकसान

Next

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालूक्यातील साकुर येथे शुक्रवारी दुपारी सुमारे तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे. हा ऊस जळल्यामुळे शेतक-याचे जवळपास दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे उद्या याच उसाची तोडणी सुरू होणार होती व ऊस कारखान्याला जाणार होता. साकुर शिवारातील गट नंबर २४५ मध्ये नितीन सीताराम साळवे यांनी तीन एकर क्षेत्रात ऊस लागवड केली होती. गत वर्षी ६० टन ऊस कारखान्याला गेला. यंदा उत्पन्न चांगले आलेले होते. त्यानुसार अंदाजे ८० टन ऊस कारखान्याला जाणार असल्याचे अंदाज साळवे यांनी व्यक्त केला. त्यानुसार उद्यापासून या उसाची तोडणी सुरू होणार होती मात्र तोडणी सुरू होण्यापूर्वीच हा ऊस जळून खाक झाल्याने साळवे यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. ग्रामस्थांनी उसाची आग विझविण्याचा प्रयत्न केला खरा परंतु आगीचे मोठे लोळ येत होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शासनाने याबाबत पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Three acres of sugarcane at Sakur, two lakhs damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक