एटीएम फोडून २८ लाखांची लूट करणाऱ्यांपैकी तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:56 AM2019-01-11T00:56:10+5:302019-01-11T00:57:04+5:30

गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्याच्या ११ तारखेला पहाटेच्या सुमारास पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील एसबीआय बॅँकेच्या एटीएम केंद्रात बळजबरीने प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने यंत्र कापून तब्बल २८ लाख २२ हजार ५०० रुपयांची रोकड घेऊन पोबारा करणाºया हरियाणा राज्यातील तिघा सराईत गुन्हेगारांच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने गुजरातमधील अहमदाबाद येथे मुसक्या आवळल्या. त्यांनी अन्य पाच साथीदारांच्या मदतीने एटीएम फोडल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

Three of the 28 lakh looters were smashed by the ATM | एटीएम फोडून २८ लाखांची लूट करणाऱ्यांपैकी तिघे ताब्यात

एटीएम फोडून २८ लाखांची लूट करणाऱ्यांपैकी तिघे ताब्यात

Next
ठळक मुद्देपोलीस संशयितांच्या मागावर : आंतरराज्य टोळीचा थैमान

नाशिक : गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्याच्या ११ तारखेला पहाटेच्या सुमारास पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील एसबीआय बॅँकेच्या एटीएम केंद्रात बळजबरीने प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने यंत्र कापून तब्बल २८ लाख २२ हजार ५०० रुपयांची रोकड घेऊन पोबारा करणाºया हरियाणा राज्यातील तिघा सराईत गुन्हेगारांच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने गुजरातमधील अहमदाबाद येथे मुसक्या आवळल्या. त्यांनी अन्य पाच साथीदारांच्या मदतीने एटीएम फोडल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथे स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. या एटीएमवर ११ आॅक्टोबर २०१८ रोजी मध्यरात्री ३ ते ४ वाजेच्या दरम्यान, संशयित साहून अलीमोहम्मद खान, शौकीन जानु खान, जुबेर जुम्मा खान (रा. गुजरात) या तिघांनी अन्य पाच साथीदारांच्या मदतीने डल्ला मारला. एटीएम यंत्र गॅस कटरने कापून त्यामधील २८ लाख २२ हजार ५०० रुपयांची रोकड या चोरट्यांनी हातोहात लंपास केली होती. यानंतर या टोळीने औरंगाबाद जिल्ह्यातील देवरगाव रंगारी येथील एटीएम, सातारा येथील कराड, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर अशा चार ठिकाणी एटीएम गॅस कटरने कापून रोकड लंपास केली होती. शिवाजीनगरचे एटीएम फोडल्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एटीएमला लक्ष्य केल्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी सांगितले. एटीएम फोडून रोकड पळविणारी ही आंतरराज्यीय टोळी असून, हे गटागटाने महराष्टÑातील विविध शहरांमध्ये फिरून एटीएमला लक्ष्य करतात.
या टोळीमधील फरार संशयितांच्या मागावर पोलीस असून, स्थानिक पोलिसांनी त्यांच्यावर बक्षीसदेखील जाहीर केले आहे. सराईत गुन्हेगारांच्या या टोळीने कोलकाता, ठाणे, नवी मुंबई, अहमदनगर अशा सर्वच जिल्ह्यांमध्येही थैमान घातले आहे.

सक्षम पुरावा नसल्याने मोठे आव्हान
शिवाजीनगरच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेजचादेखील सक्षम पुरावा पोलिसांच्या हाती नव्हता. त्यामुळे या गुन्ह्यातील संशयितांपर्यंत पोहचणे हे मोठे आव्हान होते. मागील दोन ते तीन महिन्यांपासून याबाबत तपास सुरू असताना हरियाणातील सराईत टोळीचा यामागे हात असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाघ यांनी तत्काळ पथकाचे सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हवालदार रवींद्र बागुल, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण यांचे पथक तयार करून त्यांच्या शोधार्थ रवाना केले. पथकाने अहमदाबादमधून तिघांना अटक केली आहे.

Web Title: Three of the 28 lakh looters were smashed by the ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.