भागो रे... : ‘लोकमत महामॅरेथॉन’चे रंगले दुसरे पर्व; हजारो नाशिककरांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 07:56 AM2018-12-02T07:56:55+5:302018-12-02T10:08:05+5:30

विंटोजिनो प्रस्तुत व एकता वर्ल्ड आणि अशोका समूह यांचे सहप्रायोजकत्व लाभलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाला आज पहाटे उत्साहात प्रारंभ होताच नाशिकपासून राज्ययस्तरीय 'लोकमत महामॅरेथॉन'चा बिगुल वाजला.

Thousands Participants have participated in second Part of Lokmat Maha Marathon | भागो रे... : ‘लोकमत महामॅरेथॉन’चे रंगले दुसरे पर्व; हजारो नाशिककरांचा सहभाग 

भागो रे... : ‘लोकमत महामॅरेथॉन’चे रंगले दुसरे पर्व; हजारो नाशिककरांचा सहभाग 

Next

- अझहर शेख 

नाशिक : विंटोजिनो प्रस्तुत व एकता वर्ल्ड आणि अशोका समूह यांचे सहप्रायोजकत्व लाभलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाला आज पहाटे उत्साहात प्रारंभ होताच नाशिकपासून राज्ययस्तरीय 'लोकमत महामॅरेथॉन'चा बिगुल वाजला. ही स्पर्धा पाच शहरात होणार आहे. 'नाशिक महामॅरेथॉन’ स्पर्धेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. प्रारंभी पहाटे बोच-या थंडीत ‘वॉर्म अप’ करत स्पर्धकांनी स्वत:ला ‘रन’साठी सज्ज केले. यावेळी प्रशिक्षक अनिरुद्ध आथनी यांनी धावण्याबाबतचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. सर्वप्रथम हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाजवळून २१ कि.मी अंतरावरील धावपटूंनी ‘भागो रे...’ म्हणत उत्साहातसहभागी स्पर्धकांनी धाव घेतली. त्यानंतर दहा, पाच आणि तीन किलोमीटर अंतरासाठी सहभागी झालेले धावपटू धावले.

‘लोकमत महामॅरेथॉन’चा सकाळी दहा वाजता समारोप होणार आहे. या मॅरेथॉनकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. संपुर्ण शहरात महामॅरेथॉनची वातावरण निर्मिती महिनाभरापासून झाली असल्याने शहरात सर्वत्र लोकमत महामॅरेथॉनचीच चर्चा सुरू आहे.

‘लोकमत महामॅरेथॉन’चे यंदाचे दुसरे वर्ष आहे. प्रमुख पाहूणे म्हणून महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विंटोजिनोचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश उपाध्ये, एकता वर्ल्ड चे विकास, अशोक समूहाचे अशोक कटारिया, संजय लोंढे, व्योम श्रीवास्तव, संदीप युनिव्हर्सिटीचे एन. रामचंद्रन, फोर्चून फूड चे नरेश गुप्ता, एसमबीटीचे हर्षल तांबे, एचडीएफसी गृहकर्ज विभागाचे संदीप कुलकर्णी, हॉटेल एक्सप्रेसइन चे विकास शेलार, सपकाळ नॉलेज हब चे रवींद्र सपकाळ, एलआयसी चे तुलसीदास गाडवाइले, आपोलो हॉस्पिटल चे डॉ.अनुज तिवारी, जीतूभाई ठक्कर, मिलिंद जहागीरदार, सोनी गिफ्ट्स चे नितीन मुलतानी, मोनित ढवळे, दीपक आव्हाड, प्रितेश ठक्कर, लोकमतच्या मॅरेथॉन संकल्पना राबविणाऱ्या उपक्रम प्रमुख सौ.रुचिरा दर्डा, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते.

नाशिककरांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. अत्यंत विक्रमी असा प्रतिसाद नोंदवून नाशिकरांनी लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होत विश्वासाची मोहर उमटवली. अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविणा-या लोकमत समुहाच्यावतीने आयोजित महामॅरेथॉनलाही व्यापक लोकप्रियता लाभल्याचे दिसून आले. नाशिकमधील दुस-या महामॅरेथॉनविषयी देखील नागरिकांमध्ये तितकीच उत्सुकता पहावयास मिळत होती. पाच आणि तीन किलोमीटरच्या ‘फन रन’मध्ये देखील नाशिककर अबालवृध्द कुटुंबियांसह मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

या मार्गांवर नाशिककरांची धाव
२१ कि.मी.
गोल्फ क्लब, देशदूत सर्कल- वेद मंदिर- मायको सर्कल-वनविभाग कार्यालय सिग्नल-यामाह शोरूम- हॉटेल सिबल सिग्नल- एबीबी सर्कल- आयटीआय सिग्नल-सकाळ सर्कळ-आयसीआयसीबॅँक-सातपूर विभागीय मनपा कार्यालय-सातपूर गाव आंबेडकर चौक- इएसआय रूग्णालय-भाजीबाजार-महिंद्रासर्कल - पपया नर्सरी चौक- हॉटेल संस्कृती- पासून वळण घेत पुन्हा याच मार्गाने गोल्फ क्लब.

१० कि.मी.
गोल्फ क्लब, देशदूत सर्कल- वेद मंदिर- मायको सर्कल-वनविभाग कार्यालय सिग्नल-यामाह शोरूम- हॉटेल सिबल सिग्नल- एबीबी सर्कल- आयटीआय सिग्नल-सकाळ सर्कळ-आयसीआयसीबॅँक-सातपूर विभागीय मनपा कार्यालय-सातपूर गाव आंबेडकर चौक- इएसआय रूग्णालय-भाजीबाजार-महिंद्रासर्कलला वळसा घेऊन पुन्हा याच मार्गाने गोल्फ क्कलब

५ कि.मी.
गोल्फ क्लब, देशदूत सर्कल- वेद मंदिर- मायको सर्कल-वनविभाग कार्यालय सिग्नल- हॉटेल सीबल सिग्नल- एबीबी सर्कल (डावीकडे वळण) ठक्कर डोम-लक्षीका मंगल कार्यालय- सीटीसेंटर चौक सिग्नल- संभाजी चौक- शासकीय वसाहत- जलसंपदा भवन- हनुमान मंदिर-मायको सर्कल-धामणकर चौक-गोल्फक्लब, देशदूत सर्कल.येथे समारोप.
३ कि.मी.
गोल्फ क्लब, देशदूत सर्कल- गोल्फ क्लब, देशदूत सर्कल- वेद मंदिर- मायको सर्कल-वनविभाग कार्यालय सिग्नल- यामाह शोरूम-संभाजीचौक-शासकीय वसाहत-जलसंपदा भवन-हनुमान मंदिर-मायको सर्कल-गोल्फक्लब येथे समारोप.
 
तंत्रशुद्ध पद्धतीने रोडमॅपिंग :
इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनस्ने ठरवून दिलेल्या स्टॅन्डर्डप्रमाणे २१, १० आॅणि ५ किलोमीटर अंतरावरील मार्गाचे मॅपींग करण्यात आल्याची माहिती अ‍ॅक्टीव्ह एनर्जी ग्रुपचे प्रमुख तसेच लोकमत महामॅरेथॉनचे प्रशिक्षक अनिरूद्ध अथनी यांनी दिली. सलग दोन दिवस त्र्यंबकरोडवर रात्रीच्या सुमारास रोडमॅपींग करण्यात आले. ‘कॅलीबरटेड बायसिकल मेथड’ नुसार सायकलचा वापर करून रोड मॅपींग करण्यात आले. अतिशय सुक्ष्म आणि अचुक असे मॅपींग या माध्यमातून होत असल्याने कोणत्याही तक्रारीची जागा शिल्लक राहिली नाही, असे अथनी यांनी सांगितले. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी समाधान व्यक्त करत उत्साहात सहभाग नोंदविला.
 
पर्यायी मार्गाचा अवलंब करावा
लोकमतच्यावतीने अयोजित महामॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात रंगली आहे. स्पर्धेच्या मार्गावर वाहतूकोंडी होऊ नये म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार दोन दिवसांपुर्वीच अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. पहाटे पाच ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत गोल्फ क्लब ते त्र्यंबकरोडवरील हॉटेल संस्कृती आणि गोल्फ क्लब ते एबीबी सर्कल- लक्षीका- धामणकर चौक मार्गे मायको सर्कल आणि गोल्फ क्लब या मार्गावरील वाहतूक तात्पुरती एकेरी करण्यात आलेली आहे. या मार्गावरील रहिवाशी आणि प्रवास करणा-यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. जेणेकरून कोणालाही गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही.
-अशोक नखाते, सहायक आयुक्त शहर वाहतूक शाखा

Web Title: Thousands Participants have participated in second Part of Lokmat Maha Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.