‘त्या’ नऊ विवाहेच्छुकांच्या जुळल्या रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:07 AM2019-01-21T01:07:34+5:302019-01-21T01:07:58+5:30

एचआयव्ही बाधित रुग्णाच्या जीवनाच्या आशा धुसर असतात असे बोलले जाते; मात्र वेळोवेळी योग्य औषधोपचार घेत एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीदेखील आपला जीवनसाथी सहजरीत्या शोधून संसाराचा गाडा हाकू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शहरात अशा प्रकारच्या नऊ विवाहेच्छुकांच्या रेशीमगाठी जुळून येण्याचा योग आला.

 'Those' nine silly matched silks | ‘त्या’ नऊ विवाहेच्छुकांच्या जुळल्या रेशीमगाठी

‘त्या’ नऊ विवाहेच्छुकांच्या जुळल्या रेशीमगाठी

googlenewsNext

नाशिक : एचआयव्ही बाधित रुग्णाच्या जीवनाच्या आशा धुसर असतात असे बोलले जाते; मात्र वेळोवेळी योग्य औषधोपचार घेत एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीदेखील आपला जीवनसाथी सहजरीत्या शोधून संसाराचा गाडा हाकू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शहरात अशा प्रकारच्या नऊ विवाहेच्छुकांच्या रेशीमगाठी जुळून येण्याचा योग आला.
निमित्त होते, महिंद्रा आणि महिंद्राच्या यश फाउंडेशन-नाशिक नेटवर्क आॅफ पॉझिटिव्ह पिपल आणि चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही, विहान प्रकल्प मालेगाव व जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या संयुक्त विद्यमाने गंजमाळ येथील रोटरी क्लबच्या सभागृहात राज्यस्तरीय ‘मंगल मैत्री मेळावा’ रविवारी (दि.२०) पार पडला. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून १२२ वर व ७८ विवाहेच्छुकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण अहेर, कमलाकर घोंगडे, जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे योगेश परदेशी, संगीता पवार, डॉ. भूषण सुरजुसे, डॉ. सागर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अहेर म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात विवाह हा अविभाज्य घटक असतो. प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी साथीदार हवा असतो तसा तो एचआयव्ही विवाहेच्छुकांनाही हवा असतो. त्यामुळे एचआयव्ही सहजीवन जगणाºया व्यक्तींनी आपल्या मनात दृढ आत्मविश्वास ठेवावा. मनातून खचून न जाता हिमतीने आयुष्य जगावे. प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी केले व सूत्रसंचालन चंदा थेटे यांनी केले.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या मंगल मैत्री मेळाव्यात जुळून आलेल्या एका वैवाहिक जोडप्याचा यावेळी गौरव करण्यात आला. दरम्यान, नऊ विवाहेच्छुकांचे विवाह यावेळी जुळून आले. मागील वर्षी पाच विवाह जुळून आले होते. गेल्या दहा वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे

Web Title:  'Those' nine silly matched silks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.