ते’ लोक आज लोकशाहीपुढील मोठे आव्हान - अ‍ॅड. असीम सरोदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 09:52 PM2018-05-15T21:52:08+5:302018-05-15T21:52:08+5:30

 They're a big challenge for people today - democracy. Asim Saroda | ते’ लोक आज लोकशाहीपुढील मोठे आव्हान - अ‍ॅड. असीम सरोदे

ते’ लोक आज लोकशाहीपुढील मोठे आव्हान - अ‍ॅड. असीम सरोदे

Next
ठळक मुद्देपत्रकारिता-पत्रकारांवर अन्यायच!भोगी लोकांच्या हाती सत्ता गेली माध्यामांकडे समाजाच्या संवेदना आणि विचार जागविण्याची ताकद

नाशिक : आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी दुर्देवाने भावना दुखवून घेणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. क्षुल्लक कारणांवरुन व टीकेवरुन आजकाल विविध जाती, धर्म, पंथ, समाजाच्या भावना दुखावल्या जातात आणि निषेध मोर्चे रस्त्यावर येतात; मात्र हे ‘हळव्या’ भावनांचे लोकच लोकशाहीपुढील आजचे सर्वात मोठे आव्हान आहे, असे मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
गोदाकाठावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे मंगळवारी (दि.१५) सरोदे यांनी चौदावे पुष्प गुंफले. ‘माध्यमांचे स्वातंत्र्य व लोकशाहीचा जीवंतपणा’ या विषयावर बोलताना सरोदे म्हणाले, आजची परिस्थिती बघता पत्रकारांवर प्रचंड दबाव चौहोबाजूंनी टाकला जात आहे. त्यामुळे पत्रकारिता तणावपुर्ण वातावरणात वावरते आहे. सत्ताधाºयांच्या दावणीला जणू पत्रकारिता बांधली गेली आहे की काय, अशी शंका समाज उपस्थित करु लागला आहे, हे दुर्देवाने नमुद करावेसे वाटते. टीका पचवून घेणाºयांची संख्या अत्यल्प झाल्यामुळे पत्रकारितेला सातत्याने मानहाणीचा दावा आणि निषेधाच्या धमक्यांना सामोरे जावे लागत आहे; मात्र पत्रकारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मानहाणीचा कायदा हा जुना झाला असून या कायद्यान्वये ज्यांची बदनामी झाली त्यांना सर्वप्रथम न्यायालयात त्यांची समाजात काय पत होती व त्यास काही हानी पोहचली हे सिध्द करावे लागते. माध्यमांनी सकारात्मकतेतून लोकशाही मुल्यांची जोपासना करत सर्वसामान्य व दिनदुबळ्यांच्या पाठीराखे होऊन सत्याची बाजू समाजापुढे आणण्याचे कर्तव्य पार पाडावे. कारण माध्यामांकडे समाजाच्या संवेदना आणि विचार जागविण्याची ताकद आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पत्रकारांनी पत्रकारिता अधिकाधिक पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न केल्यास मानवी जबाबदारी पार पाडण्यास मदत होईल, असे सरोदे म्हणाले. माध्यमांनी विविध क्षेत्र व राजकिय, प्रशासकिय यंत्रणेमधील ‘अस्वच्छता’ समाजापुढे आणण्याचे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. पत्रकारांनी मानहाणीच्या धमक्यांनी घाबरण्याची गरज नाही. न्यायालयाच्या निकालाच्या विश्लेषण करण्याचाही अधिकार सर्वसामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत सर्वांना आहे, असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
--
पत्रकारिता-पत्रकारांवर अन्यायच!
आजची स्थिती बघता भोगी लोकांच्या हाती सत्ता गेलेली असून वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या चालविणा-यांकडूनही पत्रकारांवर अन्यायच केला जात आहे. आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्याकडे या मंडळींचा कल आहे; मात्र पत्रकारांचे वेतनवाढ करत त्यांच्या सोयीसुविधांसाठी खर्च करण्यास कंपन्या धजावत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
-

Web Title:  They're a big challenge for people today - democracy. Asim Saroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.