आर्मी हद्दीतून चंदन वृक्षाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 06:19 PM2018-08-19T18:19:17+5:302018-08-19T18:19:43+5:30

नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील पाच चंदनाची झाडे तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याच्या घटनेस आठ दिवस होत नाही तोच चोरट्यांनी आर्मीच्या हद्दीतील चंदनाचे झाड तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याची घटना घडली आहे़

Theft of sandalwood tree from the Army border | आर्मी हद्दीतून चंदन वृक्षाची चोरी

आर्मी हद्दीतून चंदन वृक्षाची चोरी

Next
ठळक मुद्देचंदन चोरट्यांनी धुमाकूळ

नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील पाच चंदनाची झाडे तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याच्या घटनेस आठ दिवस होत नाही तोच चोरट्यांनी आर्मीच्या हद्दीतील चंदनाचे झाड तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याची घटना घडली आहे़

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बाळासाहेब बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि़१६) सकाळच्या ७ वाजेच्या सुमारास ते पेट्रोलिंग ड्युटी संपवून जात होते़ त्यावेळी ईएमई वर्कशॉप ईगल कॅन्टीनजवळील आर्मी हद्दीतील रस्त्याच्या कडेस असलेले चंदनाचे झाड चोरट्यांनी बुडापासून तोडून तीन फूट लांबीचा व दहा इंच व्यासाचा सुवासिक भाग चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले़

याप्रकरणी बोडके यांच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिकरोडला वीजमीटरची चोरी
नाशिक : नाशिकरोडच्या द्वारकानगरमधील रहिवासी सुनील परदेशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन विद्युत मोटारींसह विजेचे मीटर चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ७ आॅगस्ट ते १४ आॅगस्ट या कालावधीत ही घटना घडली असून, याप्रकरणी परदेशी यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शिंदेगावातील इसमाची आत्महत्या
नाशिक : शिंदेगावातील गौतमनगर येथील रहिवासी संजय पांडूरंग जाधव (४९) यांनी घराजवळील पत्र्याच्या शेडच्या अँगलला लुगड्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़


पंचवटीतून दुचाकीची चोरी
नाशिक : इंदिरानगरमधील रहिवासी दीप कुलकर्णी यांची १५ हजार रुपये किमतीची बॉक्सर दुचाकी (एमएच १५, एटी २९२२) चोरट्यांनी गंगाघाट येथील रामसेतू पुलाजवळील पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़


विषारी औषध सेवन करून युवकाची आत्महत्या
नाशिक : पंचवटी उदय कॉलनीतील बावीस वर्षीय मोरेश्वर राजाराम इनामदार या तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ शुक्रवारी (दि़१७) सायंकाळच्या सुमारास मोरेश्वर याने विषारी औषध सेवन केल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Theft of sandalwood tree from the Army border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.