बागलाण , मालेगाव तालुक्यातील साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित ; उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:41 PM2017-12-16T12:41:52+5:302017-12-16T12:46:42+5:30

नितीन बोरसे/सटाणा : भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार यंदा जिल्हाधिकार्यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरिक्षत करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत.

Thanjavur, Thane: Thirty villages in Baglan, Malegaon taluka declared as scarcity-hit; Order of District Collector to implement the measures | बागलाण , मालेगाव तालुक्यातील साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित ; उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश

बागलाण , मालेगाव तालुक्यातील साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित ; उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश

Next

नितीन बोरसे/सटाणा : भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार यंदा जिल्हाधिकार्यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरिक्षत करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत.
शासनाच्या टंचाई आराखड्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर , जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात टंचाई निवारणासाठी उपाययोजना करण्यात येतात. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी पाणी टंचाई निवारणासाठी भूवैज्ञानिक , भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीत सर्व्हेक्षण अहवालात बागलाण व मालेगाव तालुक्यात आॅक्टोबर ते मार्च अखेरपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहणार आहे. त्यामुळे हे सहा महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.त्यानंतर मात्र पाण्याची पातळीत घट होऊन एिप्रल ते जून हे तीन महिने या साठ गावांना पाण्याची टंचाई निर्माण होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. टंचाई निवारणासाठी खबरदारीच्या उपाय योजना जिल्हाधिकाºयांनी संबधित गावांना पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरिक्षत करण्याचे आदेश दिले आहे. हे ३१ जुलै २०१८ पर्यंत लागू राहणार आहेत. घोषित केलेल्या गावांमध्ये बागलाण तालुक्यातील चिराई ,महड ,सारदे ,वायगाव , रातीर , देवळाणे ,सुराणे,राजपूरपांडे ,श्रीपूरवडे ,टिंगरी ,उत्राणे ,वडे खुर्द ,वाघळे ,ब्राम्हणपाडे ,जायखेडा ,जाखोड ,करंजाड ,लाडूद ,निताने ,सोमपूर ,आसखेडा ,द्याने ,फोपीर ,खिरमाणी,कोटबेल ,नामपूर ,अजमिरसौंदाणे ,कर्हे ,जुनी शेमळी ,लखमापूर ,यशवंतनगर ,अंतापूर ,दगडपाडा ,जामोटी ,मोराणे दिगर ,मुल्हेर ,रावेर ,ताहाराबाद ,वडे दिगर ,अलियाबाद ,बाभूळणे ,बोरदैवत ,कांद्याचा मळा ,खरड ,परशुरामनगर ,वाघंबे तसेच मालेगाव तालुक्यातील कजवाडे ,पोहाणे,विराणे,भायगाव ,अजंग ,कोठरे बुद्रुक ,सातमाणे ,वडनेर ,पांढरून या गावांचा समावेश आहे.

Web Title: Thanjavur, Thane: Thirty villages in Baglan, Malegaon taluka declared as scarcity-hit; Order of District Collector to implement the measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक