मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

By admin | Published: May 22, 2015 10:39 PM2015-05-22T22:39:49+5:302015-05-22T22:48:52+5:30

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

Technical failure in chief minister's helicopter | मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

Next

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी सहकारी तीन मंत्र्यांसमवेत हेलिकॉप्टरने आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टरमध्ये बसणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी करण्याबरोबरच, हेलिकॉप्टरची अनेकवार चाचणी घेतल्यानंतर काही काळाने मुख्यमंत्री कोल्हापूरकडे सुखरूप रवाना झाले.
शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता दिंडोरी रोडवरील एका शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे व पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे शासकीय हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदवीदान समारंभासाठी रवाना झाले. दरम्यान, मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमानुसार दुपारी अडीच वाजता पोलीस परेड मैदानावरून त्याच शासकीय हेलिकॉप्टरने कोल्हापूरकडे रवाना होणार असल्यामुळे दिंडोरी रोडवरील हेलिकॉप्टर परेड मैदानावर उतरविण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री व सहकारीमंत्री कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने रवाना होण्यासाठी बसले असता, जमिनीपासून काही फूट उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर पुन्हा उतरविण्यात आले. हेलिकॉप्टरच्या पायलटने त्यातील तांत्रिक दोष दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु प्रत्येक वेळी हेलिकॉप्टर उडाण घेऊन पुन्हा जमिनीवर उतरविण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याच्या वृत्ताने शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. पर्यायी व्यवस्था म्हणून ओझर विमानतळावर संपर्क साधून विशेष विमानाची व्यवस्था करता येते काय याचीही चाचपणी करण्यात आली, तर दुसरीकडे हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुमीत वानखेडे व त्यापाठोपाठ जलसंपदामंत्री महाजन यांना उतरविल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा प्रयत्न करण्यात आला. त्यात ते यशस्वी ठरले. याच दरम्यान, ओझरच्या हवाई वाहतूक नियंत्रकांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर चालकाशी संपर्क साधून तांत्रिक बिघाडाबाबत माहिती घेतली असता, त्यांनी ‘ओके’ असल्याचा निर्वाळा दिल्यावर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.

Web Title: Technical failure in chief minister's helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.