माध्यमांतील राजकीय विषयावरील  टॉक शोज, चर्चा चिथावणी देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:59 AM2018-10-09T00:59:57+5:302018-10-09T01:00:47+5:30

माध्यमांतील राजकीय विषयावरील टॉक शोज, वाद-विवाद, चर्चा, मुलाखती इत्यादी कार्यक्रम चिथावणी देणारे असतात, असे सर्वसाधारण मत नाशिक शहरातील तरुणांनी व्यक्त केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. माध्यमातील हिंसा आणि संबंधित चित्रणामुळे तरुण वर्ग अनैतिक वर्तनास प्रवृत्त होतात, असाही निष्कर्ष समोर आला आहे.

 Talk shows on political issues in the media, provoking discussion | माध्यमांतील राजकीय विषयावरील  टॉक शोज, चर्चा चिथावणी देणारे

माध्यमांतील राजकीय विषयावरील  टॉक शोज, चर्चा चिथावणी देणारे

Next

नाशिक : माध्यमांतील राजकीय विषयावरील टॉक शोज, वाद-विवाद, चर्चा, मुलाखती इत्यादी कार्यक्रम चिथावणी देणारे असतात, असे सर्वसाधारण मत नाशिक शहरातील तरुणांनी व्यक्त केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. माध्यमातील हिंसा आणि संबंधित चित्रणामुळे तरुण वर्ग अनैतिक वर्तनास प्रवृत्त होतात, असाही निष्कर्ष समोर आला आहे.  हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात सर्वेक्षण केले. माध्यमे आणि तरुणांचे वर्तन व वृत्ती या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले.
नाशिक शहर परिसरातील सुमारे २३१४ नागरिकांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. यामध्ये १६५४ युवकांचा समावेश होता. या युवकांनी माध्यमांशी संबंधित विविध प्रश्नांवर आपली मते मांडली. माध्यमांची उपयुक्तता असली, तरी माध्यमांमध्ये काही दोष असल्याचे नमूद केले. वादविवादात्मक आणि चर्चात्मक कार्यक्रम, मुलाखती टॉक शोज चिथावणी देणारे असतात. या विधानावर सुमारे ५८ टक्के तरुणांनी सहमती दर्शवली, तर माध्यमांमध्ये दाखविली जाणारी हिंसा आणि सेक्सच्या चित्रणामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी अनैतिक वर्तनास प्रवृत्त होतात, असे मत सुमारे ७६ टक्के तरुणांनी व्यक्त केले.
नाशिक शहरातील ९५ टक्के तरुण वृत्तपत्रे वाचतात. एकच वर्तमानपत्र वाचणाऱ्यांचे प्रमाण ४२ टक्के आहे, तर पाच-सहा किंवा त्यापेक्षा अधिक वर्तमानपत्रे वाचणाºयांचे प्रमाण ३ टक्के आहे. दररोज किती तास दूरचित्रवाणी पाहता यावर २५ टक्के तरु णांनी उत्तर दिले आहे. दोन तासांपेक्षा अधिक वेळ दूरचित्रवाणीवर वेळ घालविण्याचे प्रमाण जवळपास ७४ टक्के आहे. या सर्वेक्षणात नाशिक शहरातील नागरिकांनी विशेषत: तरुणांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी व उपप्राचार्य तथा विभागप्रमुख प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, प्राजक्ता देशमुख, प्रा. डॉ. हेमंत राजगुरू, प्रा. रमेश शेजवळ आणि मेघा वैद्य आदींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण अभ्यासाचा एक भाग म्हणून करण्यात आले.
प्रबोधनात्मक बाबी
माध्यमांद्वारे महनीय व्यक्तींचा संवाद युवकांना प्रेरित करतो, असे जवळपास ७४ टक्के तरु णांचे मत आहे. माध्यमांनी युवकांमध्ये सामाजिकीकरण सोपे केले असल्याचे ६८ टक्के तरु णांचे मत आहे. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी माध्यमे मदत करतात, असे जवळपास ५० टक्के तरु णांनी नमूद केले.
४माध्यमे खरी जीवनमूल्ये शिकवतात असे ५१ टक्के तरु णांचे मत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता आणि कौशल्ये यात माध्यमांनी सुधारणा केली असल्याचे ७४ टक्के तरु णांचे मत आहे. माध्यमांमुळे समर्पकता वाढते, असे एकूण ७० टक्के तरु णांचे मत असल्याचे आढळून आले.
वेशभूषेवर माध्यमांचा प्रभाव पडतो, असे ७८ टक्के तरु णांचे मत आहे. मात्र, इंटरनेटमुळे तरुणांची वास्तविक मित्रांची संख्या घटल्याचे सुमारे ६८ टक्के तरुणांनी मान्य केले आहे. समाजमाध्यमांमुळे तरु णांचे मैदानी आणि बैठे खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सुमारे ७७ टक्के तरु णांनी मान्य केले आहे.

Web Title:  Talk shows on political issues in the media, provoking discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.