मालेगावी नवविवाहित तरूणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:12 PM2019-04-25T14:12:43+5:302019-04-25T14:13:17+5:30

मालेगाव मध्य : शहरालगतच्या नवीन गिरणापुलाखाली गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका नवविवाहित तरु णाचा मृतदेह आढळुन असल्याने खळबळ उडाली असून त्याचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Suspicious death of a newborn marigold youth | मालेगावी नवविवाहित तरूणाचा संशयास्पद मृत्यू

मालेगावी नवविवाहित तरूणाचा संशयास्पद मृत्यू

Next

मालेगाव मध्य : शहरालगतच्या नवीन गिरणापुलाखाली गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका नवविवाहित तरु णाचा मृतदेह आढळुन असल्याने खळबळ उडाली असून त्याचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.मृताची ओळख पटली असुन जावीद अख्तर मोहंम्मद सलीम (२६) रा.गल्ली नंबर ६,गुलशेर नगर असे मृताचे नाव आहे. सकाळी दहाच्या सुमारास गिरणापुलाखाली नदीपात्रात तरु णाचा मृतदेह पडला असल्याची माहिती पवारवाडी पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे,पवारवाडीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.जावीद अख्तरच्या गळ्यावर व मानेवर वार झाल्याच्या जखमा दिसुन आल्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रु ग्णालयात पाठविण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली. सदर युवकाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहा दिवसापुर्वीच (१५ एप्रिल) जावीद अख्तरचा विवाह झाला होता. मागील तीन दिवसांपासुन तो बेपत्ता होता.यासंदर्भात काल पवारवाडी पोलिस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Suspicious death of a newborn marigold youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक