खामखेडा परिसरात उन्हाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 05:42 PM2019-02-23T17:42:49+5:302019-02-23T17:44:52+5:30

खामखेडा : ग्रामीण भागातील तपमानात गेल्या तीन- चार दिवसांपासून अचानक वाढ झाल्याने वातावरणात उष्णता वाढ झाल्याने उन्हाचे चटके लागू लागली आहे.

Summer trunk in Khamkhheda area | खामखेडा परिसरात उन्हाचा तडाखा

खामखेडा परिसरात उन्हाचा तडाखा

Next
ठळक मुद्देफेब्रुवारीतच भासूलागला मे महिना

खामखेडा : ग्रामीण भागातील तपमानात गेल्या तीन- चार दिवसांपासून अचानक वाढ झाल्याने वातावरणात उष्णता वाढ झाल्याने उन्हाचे चटके लागू लागली आहे.
दर वर्षी मकरसंक्र ात नंतर थंडी कमी होयाला लागते. चालू वर्षी जरी अल्प पावसाळा होता. त्यामुळे या वर्षी अगदी कमी प्रमाणात थंडी राहील असा नागरिकांचा अंदाज होता. पावसाळा संपल्यांनतर त्या प्रमाणात थंडी नव्हती. परंतु डिसेंबर महिन्यापासून मोठया प्रमाणात कडाक्याची थंडी लागत होते. सकाळ-सायंकाळी बाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यामुळे वातावरणात कमालची थंड वातावरण होते.परिणामीे पिकेही चांगली होती. पिकांना पाणी सुद्धा कमी प्रमाणात लागत होते. परंतु मात्र गेल्या तीन-चार दिवसापासून वातावरणात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन प्रखर ऊन पडत असल्याने वातावरण उष्णतम झाले आहे.
या उष्ण वातावरणामुळे दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागले आहेत. तर दुपारी प्रवास करणारे डोक्यावर टोपी किंवा उपरणे बांधून प्रवास करतांना दिसून येत आहेत. या उष्ण वातावरणामुळे दुपारच्या वेळेस रस्त्याच्या कडेच्या रसवंती सूर झाल्या आहेत. या उन्हामुळे पिकांना दररोज पाणी द्यावे लागत आहेत. शेतातील पिके दुपारच्या वेळेस कोमलली दिसून येत आहे. या उष्ण वातावरणामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळी खोल जाऊ लागल्या आहेत. काही विहिरी तर कोरड्या झाल्या आहेत.
जर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी एवढ्या प्रमाणात उन्हाळी जाणवू लागला आहे, तर पुढेचे दिवस कसे राहातील याचे वर्णन करतांना दिसून येत आहेत.

Web Title: Summer trunk in Khamkhheda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक