महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेत विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:10 AM2017-09-19T01:10:17+5:302017-09-19T01:10:41+5:30

नाशिक : अठरा वर्षीय विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास डोंगरे वसतिगृह मैदानाजवळील व्ही़ एऩ नाईक महाविद्यालयात घडली़ काजल संजय साळवे (१८, शिवाजीनगर, सातपूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, बारावीच्या वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होती़

Student's suicide takes place on the college building | महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेत विद्यार्थिनीची आत्महत्या

महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेत विद्यार्थिनीची आत्महत्या

Next

नाशिक : अठरा वर्षीय विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास डोंगरे वसतिगृह मैदानाजवळील व्ही़ एऩ नाईक महाविद्यालयात घडली़ काजल संजय साळवे (१८, शिवाजीनगर, सातपूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, बारावीच्या वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होती़ दरम्यान, आत्महत्त्येचा कारणाचा शोध लागेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काजल साळवे ही सकाळी ८ वाजेच्या सुमारास महाविद्यालयात सुरू असलेल्या बारावी वाणिज्यचे पेपर देण्यासाठी आली होती़ पेपर दिल्यानंतर सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास ती अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेली व तिथून तिने खाली उडी मारली़ यामध्ये तिचे डोके, तोंड व दोन्ही हातास मार लागल्याने ग्रंथपाल भाऊसाहेब केदार यांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी गायधनी यांनी तपासून मयत घोषित केले़
या घटनेनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ़ सीताराम कोल्हे हे अधिकारी व कर्मचाºयांसह त्वरित महाविद्यालयात पोहोचले व घटनेची माहिती घेतली़ या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला़ मुलीच्या कुटुंबीयांनी घरातील वातावरण चांगले असून, मुलगी आत्महत्या करूच शकत नाही असे सांगत शहरात अफवांना ऊतनाईक महाविद्यालयातील विद्यार्थिनीने सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त शहरात कळताच विविध अफवांना ऊत आला होता़ इमारतीवरून पडल्याने काजलच्या हातावर जखमा झालेल्या असल्याने काहींनी ब्ल्यू व्हेल गेममुळे आत्महत्या केल्याची आवई उठविली होती़ मात्र, पोलीस तपासानंतरच आत्महत्येचे खरे कारण समोर येणार आहे़, तर मुलीच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली़

Web Title: Student's suicide takes place on the college building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.